वेस्ट इंडिजचे धाकड खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२२ गाजवताना दिसत आहेत. काही अपवाद सोडले, तर प्रत्येकाने हा हंगाम आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने दणाणून सोडला आहे. या खेळाडूंपैकीच एक म्हणजे रोवमन पॉवेल होय. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या पॉवेलने या हंगामात आपले पहिले अर्धशतक ५ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झळकावले होते. या सामन्यात त्याने ३५ चेंडूत ६७ धावांची वादळी खेळी केली होती. या सामन्यात त्याने सलामीवीर डेविड वॉर्नरसोबत चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे संघाला २०७ धावा करता आल्या होत्या. या सामन्यात तो इतका यशस्वी कसा झाला, याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.
रोवमन पॉवेल (Rovman Powell) म्हणाला की, सलग ३ सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर त्याने त्याच्या बॅटलाच धमकी दिली होती. माध्यमांशी बोलताना त्याने आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याविषयी बोलला. तो म्हणाला की, “मी माझ्या बॅटशी चर्चा करतो. मी आयपीएलच्या पहिल्या ३ सामन्यात जास्त धावा करू शकलो नाही. मी आपल्या खोलीत होतो. मी माझी बॅट बेडवर ठेवली आणि म्हणालो, तू मला आयपीएलमध्ये निराश करणार आहेस. तू काय करत आहेस?”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘मी तुला आणखी एक संधी देतो’
यादरम्यान पुढे बोलताना तो म्हणाला की, “ठीक आहे, मी पुढील सामना खेळायला जातोय. मी तुला आणखी एक संधी देतो. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात मला १ चेंडू खेळायला मिळाला. मी आपल्या खोलीत गेलो आणि बॅटला बेडवर ठेवून म्हणालो, मी तुला थोडा ब्रेक देत आहे. त्यावेळी मी ४-५ बॅट पाहिल्या आणि माझ्यासाठी कोण धावा करेल?”
रोवमन पॉवेलची आयपीएल २०२०मधील कामगिरी
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या रोवमन पॉवेलने राजस्थानविरुद्धही चांगली फटकेबाजी केली. त्याने या सामन्यात १५ चेंडूत ३६ धावा चोपल्या. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने १६ चेंडूत ३३ धावा केल्या होत्या. तसेच, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो २१ चेंडूत ३५ धावा करू शकला होता. आतापर्यंत पॉवेलने ११ सामने खेळताना २५.६३च्या सरासरीने २०५ धावा केल्या होत्या. यामध्ये १ अर्धशतकाचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी२०त १५७च्या वेगाला काही किंमत नसते’, उमरान मलिकवर शास्त्रींचा जोरदार निशाणा
‘तो’ काय सुपरमॅन नाहीये, जो नेहमीच विजय मिळवून देईल, म्हणत शास्त्रींची कोलकाता संघावर आगपाखड