आयपीएलच्या चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, रविवारी (८ मे) रात्री दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांच्या अडचणी मात्र सीएसकेने नक्कीच वाढवल्या. चेन्नईच्या संघाने प्रत्येक विभागात दिल्लीवर वर्चस्व राखले आणि तब्बल ९१ धावांच्या फरकाने सामना जिंकला. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याची प्रेयसी ईशा नेगी हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२२मधील पहिल्या सामन्यात विजय मिळला होता. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. तिथपासूनच संघाचे विजय आणि पराभवाचे सत्र सुरू झाले, ते अद्याप थांबलेले नाही. रविवारी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर देखील संघाला मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीचा एकही खेळाडू अर्धशतकी खेळी करू शकला नाही. संघातील आठ खेळाडू दोन आकडी धावसंख्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) देखील अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रिषभला चीअर करण्यासाठी त्याची प्रेयसी ईशा नेगी (Isha Negi) स्टेडियममध्ये उपस्थित राहिली होती. परंतु ईशाला जास्त वेळ रिषभसाठी टाळ्या वाजवता आल्या नाहीत. तो ११ चेंडू खेळला आणि २१ धावा करून बाद झाला. मोईन अलीने त्याला तंबूत पाठवले. या छोट्या खेळीत रिषभने चार चौकार मारले. रिषभने चौकार मारताच ईशा त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असल्याचे पाहायला मिळाले. तिचे व्हीआयपी बॉक्समधील फोटो आणि व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/addicric/status/1523344355980849153?s=20&t=o9oy0MHQKOhUavykNK3TgA
Pant's sister Sakshi Pant and his girlfriend Isha Negi both at the stadium today for the #DCvKKR match 🔥🥰 pic.twitter.com/lgfoO4DljK
— Aakarsh 🍥 (@AakarshTweets) April 28, 2022
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1519715463072485376
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर चेन्नईने सोपा आणि मोठा विजय मिळवला. दिल्ली कॅफिटल्सने नाणेफेक जिंकून सीएसकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, पण मर्यादित धावांवर त्यांना रोखू शकले नाहीत. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच संपूर्ण संघ अवघ्या ११७ धावा करून सर्वबाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ब्रावोला धोनीचा टोमणा; म्हणाला, ‘…ओल्ड मॅन’
शार्दुल ठाकूरला शिवम दुबेने दाखवला दबंग अंदाज; खडे-खडे भिरकावला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा गगनचुंबी षटकार