---Advertisement---

मागच्या तीन हंगामानंतर कुलदीप यादवचे आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन, दिल्लीने दिलेल्या संधीचा उचलला फायदा

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 12:09 AM
Kuldeep-Yadav
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १९व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. हा सामना रविवारी (१० एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियमवर खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सने यामध्ये ४४ धावा शिल्लक ठेऊन केकेआरला धूळ चारली. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्यांचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि सामनावीर देखील ठरला.

फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) मागच्या हंगामापर्यंत केकेआरसाठी खेळत होता, पण मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी केले. आता केकेआरविरुद्ध आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्यात त्याने जबरदस्त प्रदर्शन केले आणि स्वतःचे महत्वही दाखवून दिले. या सामन्यात कुलदीपने टाकलेल्या ४ षटकांमध्ये ३५ धावा खर्च केल्या आणि यामध्ये तब्बल चार खेळाडूंना तंबूत पाठवले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. सोबतच त्याला या अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

मागच्या आयपीएल हंगामात कुलदीप केकेआरसोबत होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. यादरम्यान तो दुखापतीचाही सामना करत होता. आयपीएल २०२० मध्येही त्याला अपेक्षित संधी मिळाल्या नव्हत्या आणि संपूर्ण हंगामात तो फक्त एक विकेट घेऊ शकला होता. आयपीएल २०१९चा विचार केला, तर या हंगामात कुलदीपच्या नावावर अवघ्या ४ विकेट्स होऊ शकल्या होत्या. परंतु आता आयपीएल २०२२मध्ये तो पुनरागमन करताना दिसत आहे. त्याने हंगामातील सुरुवातीच्या चार सामन्यात वैयक्तिक १० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

दरम्यान, दिल्ली आणि केकेआर (DC vs KKR) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर १९.४ षटकात आणि १७१ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘सूर्या’ची बॅटिंग पाहून शास्त्रींना आठवला थेट एबी डिविलियर्स; गोडवे गात म्हणाले, ‘असे खेळाडू…’

मुंबईच्या सलग चौथ्या पराभवानंतर रोहितची पत्नी झाली खूपच नाराज; व्हिडिओतील रिऍक्शन पाहाच

‘विराट भैय्या आणि फाफसोबत मजा येतेय’, मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---