इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये रविवारी (१ मे) डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसाचा पहिला लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स जेव्हा रिषभ पंतकडून महत्वाच्या धावांची आवश्यकता होती, तेव्हा तो त्रिफळाचीत झाला. मोहसिन खानने टाकलेल्या या चेंडूसाठी त्याचे कौतुक केले जात आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊकडून मिळालेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाढलाग करताना रिषभ पंत (Rishabh Pant) चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होता. त्याने ३० चेंडूत ४४ धावा केल्या होत्या. चाहत्यांना पंतचे हंगामातील पहिले अर्धशतक पाहण्याची आणि लखनऊच्या विजयाची प्रतिक्षा होती, पण तितक्यात त्याने विकेट गमावली. परिणामी लखनऊला शेवटी ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
Mohsin Khan with the big wicket of Rishabh Pant.
Live – https://t.co/wmwJlb9D5J #DCvLSG #TATAIPL pic.twitter.com/fCpB9P0QfV
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारताचा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज मोहसिन खान (Mohsin Khan) याने पंतला तंबूत माघारी धाडले. मोहसिनने टाकलेल्या १३व्या षकातील शेवटचा चेंडू रिषभ पंतच्या बॅट आणि पॅडच्या मधून थेट स्टंपमध्ये घुसला. रिषभने जेव्हा विकेट गमावली, तेव्हा दिल्लीला विजयासाठी ४३ चेंडूत ७६ धावांची आवश्यकता होती. पंत जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत चाहत्यांना विजयाची खात्री होती, पण त्याने विकेट गमावल्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली. रिषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, २३ वर्षीय मोहसिन खानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात स्वतःच्या संघासाठी खूपच जबरदस्त प्रदर्शन केले. मोहसिनने टाकलेल्या चार षटकात १६ धावा खर्च केल्या आणि ४ महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नर, रिषभ पंत, रोवमन पॉवेल आणि शार्दुल ठाकूर यांना त्याने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चालू हंगामातील त्याचा हा चौथा सामना होता. यापूर्वी खेळलेल्या तीन सामन्यात चार आणि या सामन्यात चार अशा एकूण ८ विकेट्स नावावर केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL | पुण्याच्या ऋतुराजने ‘मुंबईच्या सचिनची’ अवघ्या ३१ इनिंगमध्ये केली बरोबरी
याला म्हणतात सातत्य! एक, दोन नव्हे सलग ५ हंगामात केएल राहुलने खोऱ्याने काढल्यात धावा