गुरुवारी (दि. ०५ मे) आयपीएलच्या १५व्या हंगामातील ५०वा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. डेविड वॉर्नरच्या नाबाद ९२ धावांच्या जोरावर दिल्लीने मोठी धावसंख्या उभी केली, जी प्रत्युत्तरात हैदराबाद संघ गाठू शकला नाही. वॉर्नरप्रमाणेच गोलंदाजीत खलील अहमदने महत्वाचे योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान खलीलच्या छातीवर एक चेंडू लागला, पण सुदैवाने त्याला कोणती गंभीर दुखापत झाल्याचे दिसले नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed) सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांसाठी मोठी अडचण ठरला. त्याने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये ३० धावा खर्च केल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने सलामीवीर अभिषेक शर्मा (७), एडेन मार्करम (४२) आणि सीन ऍबॉट (७) या तिघांना तंबूत धाडले. हैदराबादच्या डावातील १३वे षटक खलीलनेच टाकले आणि याच षटकात त्याच्या छातीवर चेंडू लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तेराव्या षटकातील चौथा चेंडू खलीलने १४१ किमी ताशी वेगाने टाकला, तेव्हा स्ट्राईकवर निकोलस पूरन (Nicholas Pooran) होता. पूरनने या चेंडूवर एक कडक शॉट खेळला, जो सरळ खलीलच्या दिशेने आला. चेंडू पूरनच्या बॅटवर आदळून गोळीच्या वेगाने निघाला. खलीलने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वेगात असल्यामुळे त्याला तो पकडता आला नाही. त्याच्या हाताला चेंडू घासला आणि जोरात छातीवर लागला.
https://twitter.com/JitAnkit/status/1522271038259986432?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522271038259986432%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-ipl-2022-dc-pacer-khaleel-ahmed-hit-by-nicholas-pooran-shot-in-chest-next-ball-pacer-strikes-watch-video-4237248.html
चेंडू लागल्यानंतर खलीलच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. कर्णधार रिषभ पंत लगेच त्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या जवळ आला. त्याला वेदना होत होत्या, पण त्याने त्या सहन केल्या. पूरनने मारलेला शॉट छातीवर लागल्यानंतर तो मैदान सोडेल, अशी पूर्ण शक्यता होती. परंतु खलीलने मैदान सोडले नाही आणि पुढच्याच चेंडूवर एडेन मार्करमची विकेट घेतली. मार्करमला बाद करून त्याने आधीच्या चेंडूचा एकप्रकारे बदलाच घेतला.
एडेन मार्करम (Aiden Markram) त्यावेळी चांगल्या लयीत खेळत होता आणि संघाला विजय देखील मिळवून देऊ शकत होता. परंतु खलीलने त्याची विकेट घेऊन हैदराबादचा पराभव जवळपास पक्का केला. मार्करम आणि पूरन या दोघांची जोडी त्यावेळी घातक दिसत होती. त्यांनी अवघ्या ३५ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली होती, पण खलीलने ही भागीदारी तोडली.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरच्या नाबाद ९२ आणि रोवमन पॉवेलच्या नाबाद ६७ धावांच्या मदतीने ३ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १८६ धावा केल्या आणि २१ धावांनी पराभव स्वीकारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएल रेसमध्ये ‘हे’ चार चॅम्पियन्स सगळ्यांना धोबीपछाड देत आले समोर
वॉर्नरने सामनावीर पुरस्कार जिंकताच साधली ‘हिटमॅन’ची बरोबरी, तर धोनी पडला मागे
‘तेव्हा धोनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते’, चेन्नईच्या माजी खेळाडूने सांगितली भावूक आठवण