इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याला त्याच्या गमतीशीर स्वभावासाठी ओळखले जाते. तो नेहमी सामन्यादरम्यान काही-ना-काही करत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. शनिवारी (०२ एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे आयपीएल २०२२चा दहावा सामना झाला. गुजरातने हा सामना १४ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान नाणेफेकीवेळी कर्णधार पंतने छोटीशी चूक केली, ज्यामुळे थोड्यावेळासाठी मैदानात हशा पिकला होता.
प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर जातात. यावेळी नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला त्याचा निर्णय सांगावा लागतो व प्लेइंग इवेव्हनही जाहीर करावी लागते. गुजरात विरुद्ध दिल्ली (DC vs GT) यांच्यातील सामन्यापूर्वीही हार्दिक पंड्या आणि पंत (Rishabh Pant) यांच्यात नाणेफेक (Toss) झाली.
नाणेफेकीचा कौल पंतच्या पारड्यात पडला. आता त्याला प्रथम फलंदाजी की गोलंदाजी घेणार, याचा निर्णय सांगायचा होता. परंतु इथेच पंत गडबडला. त्याने समालोचकांना पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय सांगितला. त्यानंतर त्वरित त्याने समालोचकांना थांबवत आपण गोलंदाजी निवडणार असल्याचे सांगितले. पंत नाणेफेकीवेळी खूप उत्साहित होता आणि तो गडबडीत असे (Rishabh Pant Funny Mistake During Toss) बोलून गेला. त्याला गोंधळलेला पाहून गुजरातचा कर्णधार हार्दिक, समालोचक आणि स्वत: पंतही हसायला लागला.
यानंतर समालोचक डॅनी मॉरिसन यांनी मजेमध्ये पंतला विचारला की, तू तुझ्या निर्णयाबद्दल खात्रीशीर आहेस ना? यावर पंतने हसत उत्तर दिले. पंतच्या या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rishabh:"we will like to bat..oh…ball first" 🤣#DCvsGT pic.twitter.com/5YtdVWKrl7
— Archan (@truth8hurts) April 2, 2022
मात्र सामन्यापूर्वी पंतचा खुललेला चेहरा सामन्यानंतर पडलेला दिसला. कारण त्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल याने सर्वाधिक ८४ धावा केल्या. तसेच कर्णधार हार्दिकने ३१ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात दिल्लीकडून फलंदाजांना चांगल्या खेळी करता आल्या नाहीत. सलामीवीरांनंतर दिल्लीची मधळी फळीही सपशेल फेल ठरली. दिल्लीकडून एकट्या पंतने चिवट झुंज दिली. तो २९ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ४३ धावा करून बाद झाला. मात्र त्याची ही खेळी संघाचा पराभव टाळण्यास पुरेशी ठरली नाही आणि दिल्लीने १४ धावांनी हा सामना गमावला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर
क्या बात! आपल्याच गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी लिविंगस्टोन हवेत झेपावला, फलंदाजही बघतच राहिला
‘जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक’, शास्त्रींनी ‘या’ युवा भारतीय खेळाडूची थोपटली पाठ