इंडियन प्रीमियर लीग २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत. मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागच्या हंगामात मुंबई संघाकडून चांगली कामगिरी केली होती. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ७.४२च्या इकॉनॉमी रेटने १३० विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये इतर गोलंदाजांची इकॉनॉमी त्याच्यापेक्षा चांगली आहे. कोणते आहेत ते गोलंदाज, चला जाणून घेऊया…
१. राशिद खान
आयपीएलमध्ये ३०० हून अधिक षटके गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये आफगाणिस्तानच्या राशिद खानचा (Rashid Khan) समावेश होतो. त्याने केवळ ६.३३च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. एवढेच नाही, तर ९३ विकेट्सही घेतल्या आहेत. या ठिकाणी राशिदची इकॉनॉमी जसप्रीत बुमराहपेक्षा (Jasprit Bumrah) अधिक चांगली आहे. तो बराच काळ सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. मात्र, चालू हंगामात तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे.
२. सुनील नारायण
ऑफस्पिनर सुनील नारायण (Sunil Narine) बऱ्याच काळापासून केकेआर संघाचा भाग आहे. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज गोलंदाजाने आयपीएलमध्ये ५०० हून अधिक षटके टाकली आहेत. मात्र, त्याची इकॉनॉमी फक्त ६.७४ आहे. त्याने १४३ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने टी२० मध्ये ४२९ विकेट्स घेतल्या आहेत.
३. आर अश्विन
आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाज आर अश्विनचा (R Ashwin) विक्रम देखील उत्कृष्ट आहे. त्याने ५८३ षटकात ६.९१ च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. १४५ बळी घेतले आहेत. ३४ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो अनेक संघांसाठी खेळला आहे. सध्याच्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
४. अक्षर पटेल
अनुभवी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही (Akshar Patel) आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने ३८२ षटकात ७.२२ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. तसेच ९५ बळी घेतले आहेत. २१ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.
५. भुवनेश्वर कुमार
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही (Bhuvneshwar Kumar) आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने ४९१ षटके टाकताना ७.३०च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत आणि १४२ विकेट्स घेतल्या आहेत. तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता आणि आता देखील तो हैदराबादसाठी खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑसी क्रिकेटरचा बाउंड्री लाईनवर एकहाती झेल, मागच्या बाजूने धावत घेतलेला अवघड कॅच पाहिलात का?
बांगलादेशवरील विजयानंतर भारताची टॉप-३मध्ये उडी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशी आहेत गणिते






