---Advertisement---

IPL 2022 | फक्त फलंदाजच नाही, आयपीएलमध्ये ‘या’ पंचांनीही केलंय शतक

On: रविवार, मार्च 20, 2022 4:47 PM
Anil-Chaudhary
---Advertisement---

कोणताही क्रिकेटचा सामना मैदानात व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पंचांची भूमिका महत्वपूर्ण असते. आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा हा १५ हंगाम आहे आणि आयपीएलच्या इतिहासात अनेक दिग्गज होऊन गेले आहेत. आयपीएलच्या २० षटकांच्या सामन्यात अनेक फलंदाजांनी शतके केली आहेत, पण काही पंचही आहेत, ज्यांनी आयपीएमध्ये स्वतःचे शतक पूर्ण केले आहे.

आपण या लेखात अशा दोन पंचांची माहिती घेणार आहोत, ज्यांना १०० किंवा त्यापेक्षा अधिक आयपीएल सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे, तर एक पंच असे आहेत, जे आगामी आयपीएल हंगामा त्यांचे १०० आयपीएल सामने पूर्ण करतील.

सुंदरम यांच्या नावावर सर्वाधिक १३१ सामन्यांचा विक्रम
भारताचे ५५ वर्षीय अनुभवी पंच सुंदरम रवी यांच्या नावावर आयपीएलच्या इतिसाहात सर्वाधिक १३१ सामन्यांमध्ये पंच म्हणून भूमिका पार पाडण्याचा विक्रम आहे. सुंदरम बेंगलोरचे रहिवासी आहेत. त्यांनी २००९ साली आयपीएलमध्ये पंच म्हणून पहिल्यांदा भूमिका पार पाडलेली. त्यानंतर सुंदरम आयपीएलमध्ये नेहमीच पंच म्हणून दिसले. २०१५ ते २०१९ दरम्यान सुंदरम आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य राहिले आहेत. वेकटराघवन श्रीनिवासरन नंतर सुंदरम हे दुसरे भारतीय पंच आहेत, जे आयसीसीच्या एलीट पॅनलचे सदस्य बनले बनले. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ५८ कसोटी, ८१ एकदिवसीय आणि ३० टी-२० सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे.

अनिल चौधरींनीही केले आहे शतक
आयपीएलमध्ये १०० सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणार अनिल चौधरी दुसरे पंच आहेत. अनिल दिल्लीत राहतात आणि त्यांचे वय सध्या ५८ वर्ष आहे. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक आयपीएल सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी आयपीएलच्या मागच्या हंगामातच हा टप्पा त्यांनी पार केला होती. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आयपीएल सामन्यादरम्यान पंच म्हणून भूमिका पाहिली होती.

अनिल चौधरींना त्यांच्या निर्णय देण्याच्या क्षमतेने सर्वांनाच हैराण केले आणि त्याच्या परिणाम असा झाला की, २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना पंच म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१३ मध्ये कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत १२ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामन्यांमध्ये पंच म्हणून भूमिका पार पाडली आहे.

कुमार धर्मसेना अजून ६ सामन्यांनंतर होतील यादीत सहभागी
श्रीलंकाचे कुमार धर्मसेना लवकरच १०० आयपीएल सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहणारे तिसरी व्यक्ती बनणार आहेत. पंच बनण्याच्या आधी कुमार एक आंतररीष्ट्रीय क्रिकेटर होते. त्यांनी आतापर्यंत ९४ आयपीएल सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ८९ कसोटी, १७४ एकदिवसीय आणि ४९ टी-२० सामन्यांमध्ये पंचा म्हणून काम पाहिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

आयपीएलसाठी हिटमॅनची जोरदार तयारी, हॅलिकॉप्टर शॉट खेळत दाखवला जलवा, पाहा व्हिडिओ

वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे ‘मदन लाल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---