इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपद नवख्या गुजरात टायटन्सने पटाकवले. आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात स्पर्धेच विजेतपद पटकावणारा गुजरात राजस्थान रॉयल्सनंतर दुसरा संघ ठरला आहे. राजस्थानने देखील त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात म्हणजेच २००८ मध्ये विजेतपद पटकावले होते. यावर्षी राजस्थानला अंतिम सामन्यात जरी पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्या वाट्याला एक मोठे सुख नक्कीच आले आहे.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर अंतिम सामन्यात त्याच्या प्रतिभेप्रमाणे खेळू शकला नाही, पण अंतिम सामना संपल्यानंतर त्याला खास सन्मान मिळाला. जोस बटलर आयपीएल २०२२ चा ऑरेंज कॅप विजेता ठरला आहे. त्याने हंगामातील १७ सामन्यांमध्ये ५७,५३ च्या स्ट्राईक रेटने आणि १४९.०५ च्या स्ट्राईक रेटने ८६३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ११६ राहिली आहे. अंतिम सामन्यात बटलरने ३५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या.
राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू झाल्यापासून पर्पल कॅपचा मुख्य दावेदार होता. या शर्यतीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेला चहल अंतिम सामन्याचा आधी मात्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला. आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने त्याचा पहिला क्रमांक बळकावला होता.
पण अंतिम सामन्यात त्याने एक विकेट घेतली आणि पर्पल कॅप विजेता ठरला. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ४ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये २० धावा खर्च करून एक विकेट मिळवली. हंगामात त्याने १७ सामन्यांमध्ये १९.५१ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ७.७५ च्या स्ट्राईक रेटने ५२७ धावा खर्च केल्या आहेत.
दरम्यान, आरसीबीला यावर्षीचे विजेतेपद पटकावून दिवंगत शेन वॉर्नला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची होती. कर्णधार संजू सॅमसनने ही गोष्ट बोलून देखील दाखवली होती, पण त्यांना हे जमले नाही. असे असले तरी, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप मात्र त्यांचा संघातील खेळाडूंनी पटकावली. एकाच हंगामात एकाच संघाच्या खेळाडूंनी पर्पल आणि ऑरेंज कॅप जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. तसेच असा कारनामा करणारा राजस्थान आयपीएलमधील तिसरा संघ ठरला आहे.
एका आयपीएल हंगामात पर्पल आणि ऑरेंज कॅप जिंकणारे संघ
२०१३ – चेन्नई सुपर किंग्ज (मायकल हसी, ड्वेन ब्रावो)
२०१७ – सनरायझर्स हैदराबाद (डेविड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार)
२०२२ – राजस्थान रॉयल्स (जोस बटलर, युजवेंद्र चहल)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बटलरने ९७३ धावांचा विक्रम मोडला नाही, पण ‘या’ पराक्रमात विराटला मागे टाकलेच
आयपीएलमधील कामगिरीचे बटलरला मिळणार बक्षीस? कसोटीतील पुनरागमाबद्दल मॅक्यूलमची मोठी प्रतिक्रिया