इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम (आयपीएल, IPL 2022) अंतिम चरणात आला आहे. रविवारी रोजी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नवख्या गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात (GTvsRR) अंतिम सामना (IPL 2022 Final) रंगेल. हा सामना जिंकत गुजरात संघ पदार्पणाच्या हंगामात चषक जिंकण्याची किमया साधेल. तर तब्बल १४ वर्षांनी आयपीएल चषक उंचावण्याचा मान राजस्थानच्या पदरी पडेल. या सामन्यादरम्यान राजस्थानच्या काही शिलेदारांकडून (Rajasthan Royals Key Players) उमदा प्रदर्शनाची अपेक्षा असेल, ज्यांनी संपूर्ण हंगामात महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सामने जिंकून दिले आहेत. त्याच ३ खेळाडूंबद्दल येथे जाणून घेऊया…
राजस्थानसाठी अंतिम सामन्यात मॅच विनर ठरू शकतात हे ३ खेळाडू –
जोस बटलर (Jos Buttler)
राजस्थानसाठी सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने संघाला मजबूत सुरुवात करून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आतापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये १६ सामने खेळताना ५८.८६ च्या सरासरीने ८२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ शतके केलीत आणि ४ अर्धशतके केली आहेत. यात त्याच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील शतकी खेळीचाही समावेश आहे. अशात बटलर अंतिम सामन्यातही राजस्थान संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)
राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने संघासाठी काही सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. त्याला हंगामातील सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्याने मिळालेल्या संधीत स्वतला सिद्ध सेले आहे. चालू हंगामात ९ सामने खेळताना त्याने २६.२२ च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ अर्धशतके निघाली आहेत. अशात तो गुजरातविरुद्ध अंतिम सामन्यातही मोठी खेळी करत संघाला भक्कम सुरुवात करून देऊ शकतो.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्यासाठी चालू हंगाम धमाकेदार राहिला आहे. चहलने या हंगामात १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक १६ धावा घेतल्या आहेत. राजस्थानला बरेचसे सामने जिंकून देण्यात चहलचा मोठा हात राहिला आहे. मात्र प्लेऑफमधील २ सामन्यांमध्ये चहलला एकही विकेट घेता आली नाही. अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. अशात तो अंतिम सामन्यात आपल्या फिरकीची कमाल दाखवत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात योगदान देऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video। सुरक्षा घेरा तोडत विराटच्या फॅनची मैदानात एंट्री, कोहलीला भेटल्यानंतर जोमात लागला नाचू
हार्दिक पंड्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवणार ‘हे’ ३ शिलेदार, गुजरातला जिंकून देणार पहिले विजेतेपद?
भारीच ना! आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने काढला जपानचा वचपा, २-१ने घेतला मागच्या पराभवाचा बदला