इंडियन प्रीमियर लीग २०२२चा अंतिम सामना रविवारी (२९ मे) रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना चांगलाच रोमांचक ठरला. राजस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. जोस बटलर या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही, पण त्याने संघाला एक चांगली सुरुवात नक्कीच दिली. बटलरने यादरम्यन एका खास विक्रमाची नोंद केली.
राजस्थानचा सालामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) या सामन्यात देखील मोठी खेळी करेल, असे वाटत होते. पण तो अर्धशतक पूर्ण होण्याआधीच बाद झाला. त्याने ३५ चेंडू खेळले आणि ३९ धावा करून विकेट गमावली. यामध्ये त्याच्या ४ चौकारांचा समावेश होता. या प्रदर्शनानंतर बटलरने चालू आयपीएल हंगामात एकूण ८६३ धावा पूर्ण केल्या. ही एखाद्या खेळाडूकडून एका आयपीएल हंगामात केली गेलेली दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.
बटलर या हंगामातील प्रदर्शानंतर एका हंगामात वेगवान गोलंदाजांविरोधात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. त्याने या हंगामात केलेल्या ८६३ धावांसाठी एकूण १७ सामने खेळले. यामध्ये त्याची स्ट्राईक रेट १४९.०५ आणि सरासरी ५७.५३ धावा राहिली आहे. या धावांपैकी तब्बल ६१९ धावा त्याने फक्त वेगवान गोलंदाजांविरोधात घेतल्या आहेत.
एका हंगामात वेगवान गोलंदाजांविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये आता बटलर पहिल्या क्रमांकावर आला आहे. विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील विराटने आयपीएल २०१६ मध्ये वेगवान गोलंदाजांविरोधात ६०९ धावा केल्या होत्या.
तिसऱ्या क्रमाकंवार ख्रिस गेल आहे, ज्याने आयपीएल २०१३ मध्ये वेगवान गोलंदाजांना ५४४ धावा चोपल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर मायकल हसी आहे, ज्याने २०१३ हंगामात ५४३ धावा वेगवान गोलंदाजांविरोधात साकारल्या होत्या. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे. राहुलने आयपीएल २०२० मध्ये त्याने वेगवान गोलंदाजांना ५३४ धावा चोपल्या होत्या.
एका आयपीएल हंगामात वेगवान गोलंदाजांविरोधात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
६१९ – जोस बटलर (आयपीएल २०२२)*
६०९ – विराट कोहली (आयपीएल २०१६)
५४४ – ख्रिस गेल (आयपीएल २०१३)
५४३ – मायकल हसी (आयपीएल २०१३)
५३४ – केएल राहुल (आयपीएल २०२०)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मधील पुरस्कारांवर बटलरचेच वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’