अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची २०२० मध्ये जेव्हा निर्मिती पूर्ण झाली, तेव्हा ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बनले. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा मेलबर्नमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम होते, जे आता भारतामध्ये उभे राहिले आले. रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा अंतिम सामना याच स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा थरार रंगणार आहेत.
यापूर्वी जगातील सर्वात मोठे स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये असून त्याठिकाणी एका वेळी १ लाख आणि त्यापेक्षा काही जास्त प्रेक्षक मैदानातून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) मध्ये मात्र एका वेळी १ लाख ३२ हजार प्रेक्षक मैदानातून सामना पाहू शकतात. स्टेडियमध्ये इतरही काही विशेष बाबी आहेत, ज्याचा विचार करून आयपीएलचा अंतिम सामना याठिकाणी आयोजित केला गेला आहे.
स्टेडियम सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकही सामना असा झालेला नाहीये, जेव्हा स्टॅन्डसमध्ये प्रेक्षक पूर्ण क्षमतेने बसले असतील. कारण कोरोना महामारीच्या काळात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नव्हती. परंतु, आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरेल, याची खात्री वर्तवली जात आहे. स्टेडियमध्ये १० हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे, तर बाकीचे सर्वजन उभा राहून सामना पाहू शकतात. जर स्टेडियम पूर्ण भरले, तर या सामन्यात एक जागतिक विक्रमाची नोंद होईल.
स्टेडियममध्ये सर्वाधिक प्रक्षकांची व्यवस्था असण्याव्यतिरिक्त देखील अनेक खास गोष्टी आहेत. जसे की याठिकाणी संघांसाठी चार ड्रेसिंग रूम उपलब्ध आहेत. इतर स्टेडियमध्ये शक्यतो ड्रेसिंग रूमची संघ ही दोन असते. स्टेडियमच्या आवारामध्ये एक मोठी जीम आहे. या आकाराची जीम इतर कोणत्याही स्टेडियममध्ये पाहायला मिळणार नाही.
स्टेडियमध्ये एलईडी रिंग लाईट आहे. या लाईटमध्ये खेळणे म्हणजे खेळाडूंसाठी एक वेगळा अनुभव आहे. याठिकाणी ऑलिम्पिकच्या आकाराचा स्विमिंग पूल देखील आहे. ७६ कॉर्पोरेट बॉक्स याठिकाणी आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी २५-२५ लोक सामावू शकतात. स्टेडियमच्या आवारात ३ हजार चार चाकी गाड्या, तर १० हजार दोन चाकी गाड्यांच्या पाक्रिंगची सोय देखील केली गेली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय
IPL Final | गुजरात वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL फायनलमध्ये राजस्थानसाठी बटलरची फलंदाजीच नाही, तर ‘या’ ५ गोष्टीही ठरू शकतात जमेची बाजू