वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएल २०२२मध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पोलार्डने त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई इंडियन्ससाठी यापूर्वी अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र, चालू हंगामात तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी (६ मे) पोलार्ड पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. याच कारणास्तव भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने मोठी भविष्यवाणी केली आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२साठी ज्या चार खेळाडूंना संघात रिटेन केले होते, त्यापैकीच एक होता कायरन पोलार्ड (Kieron Pollard). परंतु मुंबई फ्रँचायझीने त्याच्यावर दाखवेलल्या विश्वासाला पात्र ठरू शकला नाही. चालू हंगामात त्याने मुंबईसाठी खेळलेल्या १० सामन्यांमध्ये १४.३३च्या सरासरीने १०९ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलल्या शेवटच्या सामन्यात पोलार्डने १४ चेंडूत अवघ्या ४ धावा केल्या आणि विकेट गमावली. याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज आकाश चोप्राला वाटते की, शक्यतो मुंबई इंडियन्स पोलार्डला पुढच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेऊ शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आकाश चोप्राच्या मते, मुंबई इंडियन्सचे काही गुणवंत खेळाडू बेंचवर बसलेले आहेत आणि पोलार्ड मात्र त्याला संधी मिळत असताना देखील चांगले प्रदर्शन करत नाहीये. आकाश चोप्रा (Aakash chopra) त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलाताना म्हणाला की, “तिलक वर्मा धावबाद झाला, पण त्याच्या आधी कायरन पोलार्ड बाद झाला. ही एक रोमांचक बाब आहे, मला वाटते की, कायरन पोलार्ड यावर्षी पुढे खेळणार नाही. बास, ते (मुंबई इंडियन्स) त्याला अजून संधी देणार नाहीत. कारण, डेवाल्ड ब्रेविस बाहेर आहे आणि टीम डेविडही चांगले प्रदर्शन करत आहे.”
सिंगापूरचा फलंदाज टिम डेविडने चालू आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहेत, पण संघाकडून त्याला अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. याविषयी बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “माहिती नाही त्यांनी टीम डेविडला आधी का नाही घेतले. त्यांनी षटकार मारणाऱ्या या मशिनला मोठ्या काळापासून बाहेर ठेवले होते. आता त्यांना आठवले की, त्याला खेळवले पाहिजे आणि त्याने एकदाही निराश केले नाहीये.”
दरम्यान शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध मिळालेल्या विजयात मुंबईसाठी टिम डेविडचे योगदान महत्वाचे ठरले. त्याने अवघ्या २१ चेंडूत ४४ धावा केल्या आणि संगाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. अवघ्या ५ धावा कमी पडल्यामुळे गुजरातला पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनची भलतीच अंधश्रद्धा! जास्त धावा करता याव्या म्हणून ‘या’ अनुभवी खेळाडूच्या बॅटचा करायचा वापर