रविवारी (१७ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२मधील २९वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूच्या शानदार खेळींच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ५ बाद १६९ धावा केल्या. मात्र गुजरातने १९.५ षटकातच ७ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले आणि ३ विकेट्सने सामनाही जिंकला. डेविड मिलर आणि प्रभारी कर्णधार राशिद खान गुजरातच्या विजयाचे नायक राहिले आहे. विजयपथावर परतल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नईला पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने क्रिकेटप्रेमी या संघाला ट्रोल करत (CSK Memes) आहेत.
ऋतुराजचे अर्धशतक व्यर्थ
प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. विशेष म्हणजे, पहिल्या ५ हंगामात ऋतुराजला खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, गुजरातविरुद्ध त्याने अर्धशतक लगावले. त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. तसेच, अंबाती रायुडूने ४६ धावा चोपल्या. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने २२ आणि शिवम दुबेने १९ धावांचे योगदान दिले. ऋतुराजने अर्धशतक करूनही ते व्यर्थ ठरले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मिलर आणि राशिद ठरले गुजरातचे तारणहार
चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून फलंदाजी करताना डेविड मिलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त प्रभारी कर्णधार राशिद खानने ४० धावा चोपल्या. मिलर आणि राशिदच्या खेळीमुळे गुजरातने हा सामना खिशात (GT Beats CSK) घातला.
ख्रिस जॉर्डनची महागडी गोलंदाजी
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना ड्वेन ब्रावोने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, महीश तीक्षणाने २ विकेट्सचे योगदान दिले. मात्र ख्रिस जॉर्डन चेन्नईचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना तब्बल ५८ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याने निर्णायक २०वे षटकही टाकले. त्यामुळे जॉर्डनही चेन्नईच्या पराभवासाठी कारणीभूत (Chris Jorden Troll) ठरला.
त्याच्या महागड्या गोलंदाजीनंतर तो चेन्नईच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. तसेच चेन्नई संघालाही त्यांच्या हंगामातील पाचव्या पराभवासाठी ट्रोल केले (GT vs CSK Twitter Reaction) जात आहे.
येथे पाहा मीम्स–
https://twitter.com/Rexxy_09/status/1515752079511351298?s=20&t=7E-eGDnMnsWXWUY-3m144g
https://twitter.com/Aatikkh/status/1515752044447289346?s=20&t=cEX32apeoVgMqzYEsC6Eyg
Unbelievable…
This is the Killer Miller we all know 🔥
Mushkil dinn me CSK ki haar ka Shukunnnn 😍 Thank you Gujarat #GTvsCSK pic.twitter.com/9AShBV0kwa— ImMahi_08 (@Mahi007cricket) April 17, 2022
Death Overs Specialist 💀¿¿¿¿¿#ChrisJordan #Jordan #CSKvsGT #Miller #GTvsCSK pic.twitter.com/N4xJyirDY9
— GURI CHAUDHARY (@GuriChaudhary77) April 17, 2022
Well played Gujrat Titans 👏🏻👏🏻
MOTM :#CSKvsGT #GTvsCSK #IPL #IPL2022 pic.twitter.com/QtNSavAbBl— Chhotu Influencer (@lil_influencer) April 17, 2022
https://twitter.com/Im_TonY2001/status/1515751777408524288?s=20&t=e3GsTmnDlO0_s_MyhXgW5g
This is exactly how Miller stole the win from CSK! #GTvCSK #IPL2022 pic.twitter.com/ASJHhBOytz
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 17, 2022
Fans: Easy win for csk?
Miller and Rashid: pic.twitter.com/UhCvIoPDST
— Arvind Schröödinger☣️ (@being__paranoid) April 17, 2022
— Kamina (@bittu7664) April 17, 2022
#CSKvsGT
MI waiting for CSK at the bottom of points table: pic.twitter.com/MnwcQz2tep— 🇮🇳 رومانا (@RomanaRaza) April 17, 2022
🥲🥲🥲🥲🥲 #CSKvsGT pic.twitter.com/nqLFGnnIQy
— Kamina (@bittu7664) April 17, 2022
https://twitter.com/_UnrealDaniel/status/1515748041642369028?s=20&t=9wxRw0rQJIF5vRHiBQf_Jw
Had CSK won the game, this pic would be all over twitter as the reason for the win pic.twitter.com/3QGm7iSaWa
— AD (@cricadharsh) April 17, 2022
दरम्यान हा चेन्नईचा हंगामातील पाचवा पराभव आहे. त्यांनी आतापर्यंत ६ सामने खेळताना ५ सामने गमावले आहेत, तर केवळ १ सामना जिंकला आहे. दुसरीकडे गुजरात संघाचा हा ६ पैकी पाचवा विजय होता. त्यांनी आतापर्यंत फक्त १ सामना गमावला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सामना गमावला, पण चेन्नईच्या कर्णधारानं केला खास कारनामा; रोहित अन् पंड्यालाही टाकलंय मागं
लईच अवघड झालं! धवनच्या प्रायव्हेट पार्टला जोराने लागला चेंडू, काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू