पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (२ एप्रिल) दुसरा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. या डबल हेडरचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा या दोन्ही संघांचा या हंगामातील प्रत्येकी दुसरा सामना आहे. दरम्यान, गुजरातचा हा स्पर्धेतीलही दुसरा सामना आहे. या हंगामात नव्याने सहभागी झालेला गुजरात संघ ब गटात आहे, तर दिल्ली संघ अ गटात आहे. त्यामुळे या हंगामात साखळी फेरीमध्ये या दोन संघात होणारा हा एकमेव सामना असणार आहे.
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Gujarat Titans vs Delhi Capitals) या दोन्ही संघांनी या हंगामातील त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही संघांचा शनिवारी विजयी लय कायम राखण्याचाच प्रयत्न असेल, आता यात कोणाला यश येणार हे पाहावे लागेल.
असे असू शकतात संभावित संघ
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संभावित ११ (Delhi Capitals Predicted XI) जणांच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास टीम सिफर्ट आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करू शकतात. तसेच मधल्या फळीत यष्टीरक्षक आणि कर्णधार रिषभ पंतसह मनदीप सिंग, रोवमन पॉवेल असतील. तर अष्टपैलू म्हणून ललित यादव आणि अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजी फळीत शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रेहमान, कुलदीप यादव आणि खलील अहमद यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.
त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरात टायटन्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (Gujarat Titans Predicted XI) बोलायचे झाल्यास सलामीला युवा शुबमन गिलसह यष्टीरक्षक मॅथ्यू वेड उतरू शकतो. तर मधली फळी अष्टपैलू खेळाडूंनी भरलेली असू शकते. यात कर्णधार हार्दिकसह डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, विजय शंकर यांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि वरुण ऍरॉन यांच्यावर सर्वाधिक भिस्त असू शकते.
आमने-सामने
गुजरात टायटन्स हा संघ या स्पर्धेतील नवीन संघ असून पहिल्यांचा सहभागी झाला असल्याने याआधी त्यांचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना झालेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात होणारा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे (MCA Stadium Pune) येथे होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना मदतगार असली, तरी ती फिरकी गोलंदाजीसाठीही अनुकूल आहे. त्याचबरोबर सध्या संध्याकाळच्या वेळी दव पडत असल्याने त्याचाही परिणाम सामन्यात जाणवू शकतो.
तसेच सामन्यावेळी पुण्यातील हवामान बऱ्यापैकी उष्ण असेल. तापमान ३१ डिग्री सेल्सियशच्या दरम्यान असू शकते. तसेच ४२ टक्के आद्रता असेल, तर ताशी १३ किमी वेगाने वारा वाहू शकतो.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) गुजरात विरुद्ध दिल्ली (GT vs DC) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना २ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, टीम सिफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, श्रीकर भरत, सरफराज खान, लुंगी एन्गिडी , मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बर, प्रवीण दुबे, एन्रिच नॉर्किया, चेतन साकारिया, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल
गुजरात टायटन्स संघ: शुबमन गिल, मॅथ्यू वेड(यष्टीरक्षक), विजय शंकर, हार्दिक पंड्या(कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर सदारंगानी, रशिद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण ऍरोन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, प्रदीप सांगवान, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नालकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, यश दयाल, नूर अहमद.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात! ५ असे भारतीय, जे एक नव्हे तर दोन विश्वचषक विजेत्या संघाचा राहिलेत भाग
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल मुंबई वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
तब्बल २८ वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे ११ नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून