IPL2022| गुजरात वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

IPL2022| गुजरात वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

आयपीएल २०२२ हंगामाच्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स  हे संघ आमने-सामने असतील. हे दोन्ही संघ या हंगामात पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या दोन नवीन फ्रेंचायझींमुळे यावर्षी आयपीएलच्या मैदानात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार आहेत. गुजरात आणि लखनऊच्या नवीन चाहत्यांना स्वतःच्या संघाचा पहिला सामना पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे ड्रीम इलेव्हन खेळणाऱ्यांनाही कुतूहल असेल की, कोणता खेळाडू खेळेल आणि कोण अपयशी ठरेल.

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन नवीन संघाचे चाहते उभय संघातील सामना पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतील, कारण त्यांना आयपीएमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या राज्याचा संघ खेळताना दिसणार आहे.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सामन्यातून कर्णधाराच्या रूपात पदार्पण करणार आहे. मागच्या हंगामापर्यंत हार्दिक मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता, पण आता पहिल्यांदाच त्याला गुजरातकडून नेतृत्वाची संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे केएल राहुल (KL Rahul) मागच्या हंगामापर्यंत पंजाब किंग्जचे नेतृत्व करत होता. राहुलचे वैयक्तिक प्रदर्शन चांगले  राहिले, पण संघाचे प्रदर्शन मात्र त्याला सुधारता आले नाही. अशात नवीन संघासोबत तो स्वतःची प्रतिमा सुधरवण्याच्या प्रयत्नात आसेल.

या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन कशी असू शकते यावर एक नजर टाकू

गुजरात टाइटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स ड्रीम ११ संघ (GT vs LSG Dream11 Team Prediction)
कर्णधार: केएल राहुल
उपकर्णधार: राशिद खान
फलंदाज: शुबमन गिल, डेविड मिलर, इविन लुईस, मनीष पांडे
यष्टीरक्षक: क्विंटन डी कॉक
अष्टपैलू: कृणाल पंड्या, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या
गोलंदाज: मोहम्‍मद शमी

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संभावित प्लेइंग इलेव्हन (GT vs LSG Probable-XI)
लखनऊ सुपर जायंट्सची संभावित प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, दुष्मंत चमीरा, अंकित राजपूत, अवेश खान, रवी बिश्नोई.

गुजरात टायटन्सची संभावित प्लेइंग इलेव्हन:
शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, वरुण ऍरॉन, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन.

महत्वाच्या बातम्या –

भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!

पंजाब संघ ‘या’ बाबतीत खरंच आहे ‘किंग्स’, भल्याभल्या संघांना जे जमलं नाही; ते यांनी करून दाखवलंय

IPL 2022 I आरसीबीच्या नव्या कर्णधाराने पहिल्याच सामन्यात केली कर्णधारपदाला साजेशी कामगिरी; विक्रमावर टाका नजर

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.