आयपीएल २०२२ चा चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) खेळला जाईल. या सामन्यात दोन नवीन आयपीएल संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने असतील. केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वगुणांची परीक्षा या सामन्यात होईल. चला तर जाणून घेऊया या सामन्याचा हवामान अंदाज आणि इतर महत्वाच्या गोष्ट.
मागच्या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्सने १७ कोटींमध्ये, तर मुंबई इंडियन्सा महत्वाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला रिटने करण्यासाठी गुजरात टायटन्सने १५ कोटी खर्च केले आहेत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्ह हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणार आहे. अशात दोन्ही कर्णधारांच्या प्रदर्शनावर चाहत्यांसह क्रिकेट जाणकारांचेही लक्ष असेल.
दुसरीकडे, केएल राहुल एक चांगल्या कर्णधाराच्या रूपात स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. कारण पंजाब किंग्जसाठी तो वैयक्तिक चांगले प्रदर्शन करत होता, पण संघाचे प्रदर्शन मात्र सुधारू शकला नव्हता.
हवामान अंदाज –
गुजारात आणि लखनऊ संघ त्यांचा आयपीएलमधील पहिला सामना खेळणार म्हटल्यावर चाहत्यांना या सामन्याविषयी नक्कीच उत्सुकता लागून आहे. अशात सामन्यादरम्यान मुंबईतील वातावरण कसे असेल, याविषयी देखील चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. हवामान अंदाजानुसार मुंबईतील वातावरण अगती स्वच्छ असणार आहे आणि पाऊस पडण्याची कसलीही शक्यता नाहीय. तापमान ३० डिग्री सेलसियस असेल. हवा १२ ते १४ किमी ताशी वेगाने वाहील.
आयपीएल २०२२ मधील गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यातील सामन्याबद्दल सर्वकाही
१. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामना कधी खेळला जाणार?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना सोमवारी म्हणजेच २८ मार्च रोजी खेळला जाईल.
२. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामना कुठे खेळला जाईल?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुंबई स्थित वानखडे स्टेडियमवर खेळला जाईल.
३. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामन्यात नाणेफेक कधी होणार?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात नाणेफेक सायंकाळी ७ वाजता होईल.
४. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामना किती वाजता सुरू होईल?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना सायंकाळी ७.३० मिनिटांनी सुरू होईल.
५. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामना कुठे पाहायला मिळेल?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येऊ शकते.
६. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२२ चा चौथा सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहयची?
– गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्ल हॉटस्टारवर पाहता येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
IPL2022| गुजरात वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
मलिंगाने १५ वर्षांपूर्वी ‘ती’ अविश्वसनीय कामगिरी करत जगाला दाखवून दिले आपण कोण आहोत
‘त्या’ महान अष्टपैलू क्रिकेटपटूने बरोबर ५८ वर्षापुर्वी घेतल्या होत्या ५ चेंडूत ५ विकेट्स…