पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर मंगळवारी (१० मे) गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली. गुजरातने तब्बल ६२ धावांनी विजय मिळवला. सामना जरी हवा तितका घासून झाला नसला, तरी त्याच्या सुरुवातीला मात्र एक मजेशीर प्रसंग घडला. दोन्ही संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि केएल राहुल नाणेफेक करण्यासाठी जेव्हा खेळपट्टीवर आले, तेव्हा हा प्रसंघ घडला.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नाणेफेक जिंकतो. परंतु तेव्हा एक मजेशीर प्रसंग चाहत्यांना पाहायला मिळाला. हार्दिक नाणेफेक जिंकला, पण लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला वाटते की, हार्दिकने नाणेफेक गमावली आहे. हार्दिकने हेड्स मागितला होता आणि हेड्स पडला देखील. पण केएल राहुलला वाटले की, हार्दिकने टेल्स मागितला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नाणेफेक करण्यासाठी वापरला जाणारा कॉईन, जेव्हा जमीनीवर पडला, तेव्हा हार्दिकने नाणेफेक जिंकली होती. पण राहुलला काही क्षणासाठी तो स्वतः नाणेफेक जिंकल्यासारखे वाटले. कारण त्याने हार्दिकचे बोलणे नीट ऐकले नव्हते. यावेळी राहुल म्हणाला की, ‘हा टेल्स म्हटला ना…?’ यावर प्रत्युत्तर देताना हार्दिक हैराण होता आणि म्हणाला, ‘नाही मी हेड्स म्हटलो होत.’ हा प्रसंगी प्रत्येकाचीच चिंता वाढली होती, पण क्षणात दोघांमध्ये मजा मस्करी सुरू झाली आणि चाहत्यांनी देखील याचा आनंद घेतला.
#GujaratTitans have won the toss and they will bat first against #LSG.
Live – https://t.co/45TbqyBfE3 #LSGvGT #TATAIPL pic.twitter.com/pQB53PfPD3
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला तर, नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित २० षटकांमध्ये गुजरात टायटन्सला ४ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १४४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघासाठी हे लक्ष्य सोपो वाटत होते, पण त्यांना ते गाठता आले नाही. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ अवघ्या १३.५ षटकांमध्ये ८२ धावा करून सर्वबाद झाला. गुजरातसाठी फिरकीपटू राशिद खानने २४ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गुजरात आणि लखनऊ या दोन्ही संघांसाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. लखनऊने जर साखळी फेरीतील अजून एक सामना जिंकला, तर गुजरात पाठोपाठ प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतला गुरूमंत्र, माजी भारतीय कोचने ‘आंद्रे रसेल मोड’मध्ये फलंदाजी करण्याचा दिला सल्ला
मोठी बातमी! रविंद्र जडेजा जाणार आयपीएल २०२२ मधून बाहेर? मोठे कारण आले समोर
‘काहीतरी मोठे होणार आहे’, रोहित शर्माबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलूची खास भविष्यवाणी