पुणे – मध्यरक्षक पूर्वा गायकवाड हिच्याकडे १८ सदस्यीय पुणे जिल्हा फुटबॉल संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आंतर-जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी हा संघ जाहिर करण्यात आला. स्पर्धा १७ वर्षांखालिल गटाची असून, नाशिक येथे होणार आहे.
संघाच्या मुख्य प्रशिक्षक पूजा धुमाळ आणि व्यवस्तापक आशिष कटरा यांच्या मार्गदर्शनाखाली १० दिवस झालेल्या सराव शिबिरातून या संघाची निवड करपण्यात आली. सिरील आशिर्वदम, मॅथ्यू सुसेनाथन, अमर परदेशी आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रदिप परदेशी हे देखिल या वेळी उपस्थित होते.
पुण्याच्या मोहिमेस अकोला वि. हिंगोली यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध सुरवात होणार आहे. हा सामना १४ मे रोजी होईल.
संघ – पूर्वा गायकवाड (कर्णधार), राहिन शेख (उपकर्णधार), अस्मी कुलकर्णी, वेदांती हरिपूरकर, महेक शेख, सिमरन शेर्ला, सिद्धि पाटिल, संजना गुप्ता, पूजा गुप्ता, रोशनी पंडित, आदिती ननानवरे, आदिती शितोळे, नियती अगरवाल, स्नेहा सांडभोर, पियुषा नरके, दिव्या बसंतानी, तानिया गायकवाड, श्वेता मालंगवे, पूजा धुमाळ, व्यवस्थापक – आशिष कटारा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पायातून बूट निसटल्यावरही मुलीने जिंकली २०० मीटरची शर्यत, व्हायरल Video तुम्हालाही करेल प्रेरित