---Advertisement---

पायातून बूट निसटल्यावरही मुलीने जिंकली २०० मीटरची शर्यत, व्हायरल Video तुम्हालाही करेल प्रेरित

On: बुधवार, मे 11, 2022 6:17 PM
---Advertisement---

कोणत्याही खेळात समर्पण खूप महत्त्वाचे असते. याचे उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुरुवातीला एका शाळकरी मुलीच्या पायातील बूट निघून जातात. तरीही ती सर्वांमागून पुढे जात शर्यतही जिंकते. तिच्या या व्हिडिओ वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसते की, शर्यतीची (200 Meter Race) सुरुवात होते आणि त्या मुलीने धावायला सुरुवात करताच तिच्या एका पायातील बूट निघून जातो. मग ती शर्यत सोडून देण्याऐवजी माघारी जायचे ठरवते आणि बूट पुन्हा पायात घालते. यादरम्यान शर्यत पाहण्यासाठी आलेले तिचे कुटुंबीय तिला स्टँड्समधून चीयर करतात.

पायातून निसटलेला बूट पुन्हा घालण्याच्या नादात तिचे ७ सेकंदही वाया जातात. तरीही ती वेगाने धावत शर्यत पूर्ण करते. विशेष म्हणजे, ती या शर्यतीत पहिलीही येते. या मुलीचे नाव ले ले (Lay Lay) असून ती प्रोफेशनल मुक्केबाज टेरेन्स क्रॉफर्ड (Terence Crawford) याची मुलगी आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

IPLच्या पहिल्या प्लेऑफ टीमची घोषणा, गुजरात टायटन्सने सामन्यात भरले रंग; जाणून घ्या काय म्हणाले शमी आणि गिल

आपल्या खराब फॉर्मबद्दल पहिल्यांदाच बोलला विराट; गोल्डन डकविषयी म्हणाला, ‘खूप असहाय…’

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत अंशुल पुजारीचा सनसनाटी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---