---Advertisement---

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत अंशुल पुजारीचा सनसनाटी विजय

On: बुधवार, मे 11, 2022 5:09 PM
Tennis
---Advertisement---

पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर अंशुल पुजारी याने सातव्या मानांकित आरव बेलेचा 6-0, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित स्मित उंद्रेला आर्यन कीर्तने याने विजयासाठी चांगलेच झुंजवले. स्मितने आर्यनवर 6-4, 4-6, 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित आरव पटेलने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या पृथ्वीराज दुधानेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित रौनक हरियानीने नील देसाईला 7-5, 6-4 असे पराभूत केले.

मुलींच्या गटात पहिल्या फेरीत रितू ग्यान, अहाना पाटील, प्रांजली पांडुरे, शिबानी गुप्ते, काव्या तुपे, विवा तलरेजा यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुले:
स्मित उंद्रे[1]वि.वि.आर्यन कीर्तने 6-4, 4-6, 6-1;
अंशुल पुजारी वि.वि.आरव बेले[7]6-0, 6-3;
आरव पटेल[3]वि.वि.पृथ्वीराज दुधाने 6-3, 6-2;
अझलन शेख वि.वि.अवि मिश्रा 6-4, 6-2;
रौनक हरियानी[4]वि.वि.नील देसाई 7-5, 6-4;

मुली: पहिली फेरी:
रितू ग्यान वि.वि.अद्विया नाजिया 6-1, 6-4;
अहाना पाटील वि.वि.वैदेही शिंदे 6-3, 6-4;
प्रांजली पांडुरे वि.वि.हर्षा देशपांडे 6-3, 6-4;
शिबानी गुप्ते वि.वि.सारा फेंगसे 6-1, 6-1;
काव्या तुपे[8]वि.वि.अनुष्का जोगळेकर 6-3, 6-2;
विवा तलरेजा वि.वि.त्रिशा अरबाळे 6-4, 6-3;

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए सुपर सिरीज: महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेचा मानांकित खेळाडूवर विजय

जेव्हा सचिनच्या चेंडूवर धोनीने लाराला केलेले यष्टीचीत, मास्टर-ब्लास्टर म्हणालेला ‘बोला था ना मैंने’

क्रिकेटसाठी दररोज २५ किमी सायकलने पार करायचा ‘हा’ गोलंदाज, आता बनलाय पंजाब किंग्जचा हुकुमी एक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---