Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा सचिनच्या चेंडूवर धोनीने लाराला केलेले यष्टीचीत, मास्टर-ब्लास्टर म्हणालेला ‘बोला था ना मैंने’

जेव्हा सचिनच्या चेंडूवर धोनीने लाराला केलेले यष्टीचीत, मास्टर-ब्लास्टर म्हणालेला 'बोला था ना मैंने'

May 11, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
MSDhoni-Sachin-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/RandomCricketP1


सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्याने अनेकदा आपल्या दमदार कामगिरी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याच्या अनेक कामगिरीही अविस्मरणीय राहिल्या आहेत. त्यातील त्याने २००७ साली नागपूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात ब्रायन लाराची विकेट आजही सर्वांच्या लक्षात असेल. दरम्यान, सध्या त्याच्या या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

२००७ साली वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी २१ जानेवारी रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात (Nagpur ODI 2007) भारताने ५० षटकात ३ बाद ३३८ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून सौरव गांगुलीने सर्वाधिक ९८ धावा केल्या होत्या. तसेच तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने नाबाद ५४, गौतम गंभीरने ६९, एमएस धोनीने नाबाद ६२ धावा केल्या होत्या. तसेच सचिनने ३१ धावांचे योगदान दिले होते.

पण, भारतीय फलंदाजांप्रमाणेच वेस्ट इंडिजचे फलंदाजही नंतर ३३९ धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांचा घाम काढत होते. वेस्ट इंडिजकडून ख्रिस गेल आणि शिवनारायण चंद्रपॉल यांची जोडी सलामीलाच जमली होती. पण अखेर हरभजन सिंगने गेलला ५२ धावांवर बाद केले आणि जोडी फोडली. पण चंद्रपॉल काही भारतीय गोलंदाजांना ऐकत नव्हता. त्याला नंतर मार्लोन सॅम्यूएल्सचीही साथ मिळाली. पण, सॅम्यूएल्सची ४० धावा करून बाद झाला.

पण, त्यानंतर ब्रायन लारा ५ व्या क्रमांकावर चंद्रपॉलची साथ देण्यासाठी उतरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत वेस्ट इंडिजला विजयाच्या दिशेने नेले होते. पण, याचवेळी ४१ व्या षटकात सचिन तेंडुलकर गोलंदाजीसाठी उतरला. यावेळी या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लाराने क्रिजमधून बाहेर येत फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, तो चूकला. त्यावेळी भारतीय संघात नवखा असलेल्या यष्टीरक्षक एमएस धोनीने चेंडू चपळाईने पकडला आणि स्टंपला लावत लाराला यष्टीचीत केले.

ही विकेट किती महत्त्वाची होती, हे विकेट घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चेहऱ्यावरील आनंदाने स्पष्ट दाखवून दिले. लाराला (Brian Lara) बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना सचिन धोनीला (MS Dhoni) ‘मी म्हणालेलो ना’ असे म्हणताना दिसला होता. हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Since the morning upload sparked a @sachin_rt bowling appreciation flood, here's him dismissing @BrianLara , not for the first time in ODIs. His 'Bola Tha Maine' to Dhoni tells that he anticipated Lara coming down the track. Also, link to the 1993 dismissal is in the reply pic.twitter.com/M5dKe0NQ84

— TheRandomCricketPhotosGuy (@RandomCricketP1) May 9, 2022

या सामन्यात नंतर चंद्रपॉलला बाकी कोणाची फारशी साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताने हा सामना १४ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजला ५० षटकात ८ बाद ३२४ धावा करता आल्या. पण चंद्रपॉलने केलेल्या १४९ धावांच्या नाबाद खेळीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिकेटसाठी दररोज २५ किमी सायकलने पार करायचा ‘हा’ गोलंदाज, आता बनलाय पंजाब किंग्जचा हुकुमी एक्का

रिषभ पंतला गुरूमंत्र, माजी भारतीय कोचने ‘आंद्रे रसेल मोड’मध्ये फलंदाजी करण्याचा दिला सल्ला

मोठी बातमी! रविंद्र जडेजा जाणार आयपीएल २०२२ मधून बाहेर? मोठे कारण आले समोर


ADVERTISEMENT
Next Post
Photo Courtesy: Facebook/RolandGarros

एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए सुपर सिरीज: महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरेचा मानांकित खेळाडूवर विजय

Tennis

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत अंशुल पुजारीचा सनसनाटी विजय

Virat-Kohli

आपल्या खराब फॉर्मबद्दल पहिल्यांदाच बोलला विराट; गोल्डन डकविषयी म्हणाला, 'खूप असहाय...'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.