मुंबई। शुक्रवारी (६ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ५१ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमने-सामने आले होते. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात युवा सलामीवीर इशान किशन यानेही चांगले योगादान दिले. दरम्यान, त्याने फलंदाजी करताना एक शानदार षटकारही मारला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला (Gujarat Titans vs Mumbai Indians) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सलामीला फलंदाजीसाठी आले. इशान किशन (Ishan Kishan) आणि रोहित शर्माने (rohit sharma) मुंबईला चांगली सुरुवात करून देताना सलामीला ७४ धावांची भागीदारी केली. पण या दोघांचेही अर्धशतक थोडक्यात हुकले.
रोहितने ४४ धावांची खेळी केली. तसेच इशानने २९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. या खेळीत इशानने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने हा एकमेव षटकात मुंबई इंडियन्सच्या ९ व्या षटकात राहुल तेवतियाविरुद्ध खेळताना मारला. तेवतियाने या षटकातील टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर इशानने पुढे येत मिड-विकेटवरून षटकार खेचला. यावेळी हा चेंडू तब्बल १०४ मीटर लांब जात षटकार गेला (Ishan Kishan Hits 104 Meter Six). इशानने मारलेल्या या षटकारावर राहुल तेवतिया देखील चकीत झाला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/vicharabhio/status/1522598140716584960
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
रोहित आणि इशान बाद झाल्यानंतर अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिडने आक्रमक खेळ केला. त्याने मुंबईकडून २१ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने २० षटकात ६ बाद १७७ धावा करत गुजरात समोर १७८ धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
गुजरातला ५ धावा पडल्या कमी
या सामन्यात (GT vs MI) १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केल्या. साहाने ५५ आणि गिलने ५२ धावा केल्या. या दोघांनी सलामीला १०६ धावांची सलामी भागीदारी देखील रचली. पण, हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना आक्रमक खेळ करता आला नाही.
अखेरच्या षटकात गुजरातला ९ धावांची विजयासाठी गरज होती. पण मुंबईकडून गोलंदाजी करताना डॅनिएल सॅम्सने (Daniel Sams) केवळ ३ धावाच अखेरच्या षटकात दिल्या. त्यामुळे गुजरातला २० षटकात ५ बाद १७२ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला. मुंबईकडून मुरूगन अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
साई सुदर्शन आयपीएलमध्ये ‘हिट विकेट’ होणारा पहिलाच नाही, ‘हे’ १२ खेळाडूही झालेत असेच आऊट
क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम
आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट