गुरुवारी (१९ मे) हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ८ विकेट्सने पराभव स्वीकारला. हार्दिकने ४७ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हा सामना हाण्यासाठी मैदानात उपस्थित होती. गुजरातच्या फलंदाजीदरम्यान असे काही घडले, ज्यामुळे नताशा चांगलीच हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.
गुजरात टायटन्सच्या डावात तसे पाहिले तर अनेक रोमांचक प्रसंग घडले, पण एका प्रसंगामुळे हार्दिकची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) हैराण झाली. हा प्रसंग डावाच्या १० व्या षटकात घडला. आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील शेवटचा चेंडू हार्दिकने लांब मारण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने एवढ्या जोरात बॅट घुमावली, ती हातातून सटकली स्क्वेअर लेगच्या पंचांसमोर जाऊन पडली.
या घटनेनंतर सामना पाहणारा प्रत्येक चाहता हैराण झाला. स्टॅन्डसमधून सामन्याचा आनंद घेणारी हार्दिकची पत्नी नताशा देखील बॅट हवेत उडल्याचे पाहून आश्चर्यचकीत झाला होती. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत नताशा काहीतरी बडबडताना दिसत आहे. शक्यतो ती शेजारच्या व्यक्तीला म्हणत आहे की, “हे कसे झाले.” नताशाच्या या रिएक्शनवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स देत आहेत. तर अनेकजन कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
https://twitter.com/ReemaMalhotra8/status/1527301684917342208?s=20&t=FHRQln2dvstGZ5RJHK0Piw
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीच्या सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन केले. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. गुजरातने विजयासाठी दिलेले १६९ धावांचे लक्ष्य आरसीबीने १८.४ षटकात गाठले. विराट कोहली मोठ्या काळानंतर त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये दिलसा. त्याने ५४ चेंडूत ७३ धावा केल्या, यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. डू प्लेसिसने ३८ चेंडूत ४४ तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या १८ चेंडूत ४० धावा ठोकल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यापूर्वी जडेजा आणि सूर्यकुमारच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट, संघात निवड होणे निश्चित; पण…
ब्रेकिंग.! भारताच्या निखत झरीनला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
ब्रेकिंग.! भारताच्या निखत झरीनला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक





