गुरुवारी (१४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सला गुजारत टायटन्सने पराभूत केले. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने ३७ धावांनी विजय मिळवला. अष्टपैलू हार्दिक पंड्या जेव्हापासून गुजरातचा कर्णधार बनला आहे, त्याला स्वतःचा जुना फॉर्म पुन्हा गवसल्याचे दिसत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने कर्णधार संजू सॅमसनला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्यासाठी हार्दिकचे चाहत्यांकडून आणि जाणकारांकडून खूप कौतुक होत आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पहिल्या सामन्यापासून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. असेच प्रदर्शन केले, तर त्याचे लवकरच भारतीय संघातही पुनरागन होऊ शकते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने एक अतिशय वेगवान थ्रो करून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याला तंबूत पाठवले. ही घटना राजस्थानच्या डावाच्या ८ व्या षटकात घडली. लॉकी फर्ग्यूसनने टाकलेल्या १५० किमी ताशी वेगाचा चेंडू सॅमसनने मिड ऑफच्या दिशेने खेळला. पण त्याला याचा अंदाज आला नाही की त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा हार्दिक पंड्या चपळाई दाखवेल.
हार्दिकने चेंडू हातात आल्यानंतर क्षणाचाही विलंब केला नाही आणि नॉन स्ट्राईकच्या मिडल स्टंप्सवर अचूक थ्रो मारला. हा थ्रो वेगात असल्यामुळे जेव्हा चेंडू स्टंपला लागला, तेव्हा सॅमसन कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये देखील दिसत नव्हता. हार्दिकने मारलेल्या या थ्रोची गती यावरून समजू शकते की, नॉन स्ट्राइक एंडवरील स्टंपचे दोन तुकडे झाले. या घटनेनंतर समालोचक हसत होते, तर चाहत्यांमध्ये हैराणी व्यक्त केली जात होती. त्यानंतर पंचांना नवीन स्टंप मागवावा लागला आणि तोपर्यंत सामना थांबवला देखील गेला.
https://twitter.com/Rahulsarsar177/status/1514674320886624256
दरम्यान, गुजरातला मिळालेल्या विजयाचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स ९ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा करू शकला आणि संघाला ३७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
https://twitter.com/Cricupdates2022/status/1514647359220686857
प्रथम फलंदाजी करताना गुजरातसाठी हार्दिक पंड्याचे योगदान कर्णधारपदाला शोभणारे होते. त्याने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. तसेच अभिनव मनोहरने २८ चेंडूत ४३ धावा ठोकल्या. या दोघांमध्ये ५५ चेंडूत ८६ धावांची महत्वाची भागीदारी देखील पार पडली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग.! जो रुटकडून इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा
GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video
फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक