इंडियन प्रीमियर लीगचा १६वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पंजाबने मागील सामन्यात सीएसकेला पराभूत केले. या हंगामात संघाने ३ सामन्यांपैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाबचा रन रेट +०.२३८ असून संघ पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातने दोन सामने खेळले असून दोनही सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात +०. ४९५ रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.
ब्रेबॉर्न स्टेडिअमवर मागच्या दोन सामन्यांमध्ये १८०हून अधिक धावसंख्या झाल्या. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळेल, नंतर फलंदाजांना धावा करणे सोपे जाईल. जर गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट नाही घेतली, तर मोठी भागीदारी करावी लागेल.
केएल राहुलने (KL Rahul) कर्णधारपद सोडल्यानंतर पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) यावेळी जास्त अपेक्षा ठेवल्या नाहीत. बेंगलोरविरुद्ध संघाने २०६ धावांच्या लक्ष्य गाठले. जगातील क्रिकेट लीगमध्ये धमाल करणारा लियाम लिव्हिंगस्टोनची शानदार खेळी फ्रॅंचायझीसाठी मोठा सकारात्मक पाॅइंट आहे. त्याने सीएकेविरुद्ध ३२ चेंडूत ६० धावांची खेळी खेळी केली आहे आणि दोन विकेट घेतल्या आहेत. या खेळीनंतर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात त्याच्या धडाकेबाज खेळीचा संघाला फायदा होऊ शकतो.
त्याच्याशिवाय शिखर धवन आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंवर सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहेत. मयंक अग्रवाल वेगवान खेळीमुळे सुरुवातीलाच विकेट गमावत आहे. जर त्याने सुरुवातीला थोडा संयम दाखवला, तर मोठी खेळी खेळने सहजच शक्य होईल. शाहरुख खान आणि ओडियन स्मिथ ही जोडी मध्यक्रमात फलंदाजी करण्यास तयार दिसत आहेत. कागिसो रबाडा शेवटच्या क्रमांकावर सुद्धा गोलंदाजीसोबतच उत्तम फलंदाजी करत गेमचेंजर ठरू शकतो.
दुसऱ्या बाजूला हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आहे, ज्या संघाने आत्तापर्यंत एकही सामना पराभूत झाला नाही. संघाने या हंगामात खेळलेले दोनही सामने जिंकले असून चार अंकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ४६ चेंडूत ८४ धावा केल्या आहेत. त्याने १८२च्या स्ट्राईक रेटने खेळताना ६ चौकारांच्या आणि ४ षटकारांच्या मदतीने गिलने शानदार खेळी केली.
गुजरातचे गोलंदाजी युनिट भक्कम आहे. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, राशिद खान आणि हार्दिक पंड्यासारखे खेळाडू संघाच्या गोलंदाजी युनिटमध्ये आहेत. कदाचित हार्दिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. मात्र, आता तो आयपीएलमध्ये गुजरातचा कर्णधार बनला आहे. हार्दिकची कामगिरी पाहता त्याने चांगले पुनरागमन केल्याचे दिसत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयुष बदोनीच्या ३ चेंडूतील वादळी खेळीने वेधले लक्ष! चाहत्यांना आली धोनी-विराटची आठवण
Maharashtra Kesari | ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ चरित्र ग्रंथाच्या १५व्या आवृत्तीचे प्रकाशन
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक