आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मंगळवारी (१९ एप्रिल) हंगामातील ३१ वा सामना खेळवला जाणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल संघासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि त्याच्याकडून चाहत्यांना देखील खूप अपेक्षा आहेत. आता लखनऊविरुद्धच्या सामन्याआधी हर्षल गोलंदाजी ऐवजी फलंदाजीचा सराव करतना दिसला आहे.
हर्षल पटेल (Harshal Patel) संघाला आयपीएल २०२२ मध्ये शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत करत असल्याचे दिसत आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याआधी हर्षल नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला, जे पाहून चाहतेही उत्सुक झाले आहेत. आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओत वेगवान गोलंदाज हर्षल फलंदाजीचा कसून सराव करताना दिसत आहे. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, हर्षल पटेल एखाद्या अनुभवी फलंदाजाप्रमाणे एखादा चेंडू षटकारासाठी मारला की, पुन्हा त्याच्याकडे पाहत देखील नाहीय. चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे, ज्यामध्ये हर्षल पूर्ण आत्मविश्वासासह खेळत आहे.
Catch a glimpse of him putting in those extra yards on @KreditBee presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #LSGvRCB pic.twitter.com/kIr6YxNwWo
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 19, 2022
दरम्यान, आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीने हर्षल पटेलला एका वेगवान गोलंदाजाच्या रूपात संघात सहभागी केले असले, तरी तो संघासाठी फलंदाजीत देखील महत्वाचे योगदान देऊ शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हर्षल एका अष्टपैलूच्या भूमिकेत खेळत असतो. अशात जर हर्षलने चालू आयपीएल हंगामात गोलंदाजी आणि सोबतच फलंदाजीत योगदान दिले, तर आरसीबीसाठी तो एक खूपच महत्वाचा खेळाडू ठरेल.
आयपीएलच्या चालू हंगामात हर्षलला आतापर्यंत दोन वेळा फलंदाजीची संधी मिळाली. या दोन डावांमध्ये त्याने १९० च्या स्ट्राइक रेटसह १९ धावा केल्या. तर गोलंदाजाच्या रूपात त्याने आतापर्यंत ६ खेळाडूंना तंबूत पाठवले आहे. दरम्यान, हंगामातील राहिलेल्या सामन्यांमध्ये हर्षल आरसीबीसाठी कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागणार आहे. मागच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता, आता चालू हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांचे लक्ष आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोरोनामुळे ट्वीटरवर ‘कॅन्सल आयपीएल’ ट्रेंडला, जाणून घ्या मुंबई आणि सीएसकेचे चाहते का होतायत ट्रोल?
IPL2022| लखनऊ वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!