इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये पार पडणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर सीएसके संघाचा कर्णधार एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजिनामा दिला आहे. आता रविंद्र जडेजाला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचा कर्णधार आणि दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्याने स्वत:ला भाग्यवान मानले आहे. आता धोनी कर्णधार नसताना डु प्लेसीस सुद्धा संघाचा भाग नाही.
धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डु प्लेसीस म्हणाला, “मी भाग्यवान होतो की, मी खुप काळ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो. धोनी ज्या पद्धतीने संघाची कमान सांभाळतो, ते मला जवळून पाहण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी नशीबवान आहे.” धोनीने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच म्हणजे २००८ पासून संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसके संघ ४ वेळा आयपीएलचा विजेता संघ ठरला आहे.
तसेच डु प्लेसीसने आरसीबीचे नेतृत्व करण्याबबात सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. तो या हाय प्रोफायल संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. कारण त्याच्या मदतीसाठी संघात विराट कोहलीसारखा अनुभवी माजी कर्णधार उपस्थित असणार आहे. त्याला आरसीबीने ७ कोटींना विकत घेतले होते. या अगोदर तो २०१२ पासून सीएसके संघाचा भाग होता.
डु प्लेसीस म्हणाला की, “त्याला विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी खेळाडूंचा फायदा होईल. विराट खुप काळ भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारतीय क्रिकेट आणि आरसीबीचा खुप चांगला कर्णधार होता. त्यामुळे तो अनुभव, माहिती आणि ज्ञानामध्ये कोणापेक्षा कमी नाही.”
पुढे फाफ डु प्लेसीस म्हणाला, “सोबतच ग्लेन मॅक्सवेल. त्याने अनेक सामन्यात संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे, विशेष म्हणजे टी२० क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्याचा रणनीती बनवण्याचा मार्ग आणि कल्पना वेगळाच आहे. तसेच सोबत दिनेश कार्तिक देखील आहे.” फाफ डु प्लेसीसने आयपीएलमध्ये १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने ‘करुन दाखवलं’, पाकिस्तानला त्यांच्याच मातीत लोळवलं; कसोटी मालिका १-० जिंकली
Video: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने थेट मैदानी पंचांशी घेतला पंगा; म्हणे, ‘मला रूल बूक दाखवा, मगच…’
धोनीने विराटप्रमाणेच सोडले संघाचे कर्णधारपद, पाहा दोघांच्या निर्णयात काय आहे साम्य