इंडियन प्रीमिअर लीग असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही प्रकार असो वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू ख्रिस गेल नेहमीच उजवा ठरला आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आयपीएलमध्येही एका सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तोच अव्वलस्थानी आहे. त्याने अवघ्या ६६ चेंडूत १७५ धावांचा पाऊस पाडला होता. इतकी जबरदस्त फलंदाजी करणारा गेल मात्र यंदाच्या आयपीएल २०२२ हंगामात सहभागी झाला नाहीये. आता याबाबतच त्याने मोकळेपणाने चर्चा केली आहे.
ख्रिस गेल (Chris Gayle) म्हणाला आहे की, त्याला योग्य वागणूक दिली गेली नाही. तसेच, त्याला जो सन्मान मिळायला पाहिजे होता, तोदेखील दिला गेला नव्हता. त्याने आयपीएल २०२२च्या लिलावात आपले नाव दिले नव्हते. गेल आयपीएल लीगमध्ये ३ संघांसाठी खेळला आहे. त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांचा समावेश आहे. गेलला मागील काही हंगामात प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत संधी मिळत नव्हती. तसेच, बायो-बबल आणि थकव्यामुळे त्याने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान स्पर्धेतून आपले नाव माघारी घेतले होते.
गेल म्हणण्यानुसार माध्यमांनी सांगितले की, “मागील काही वर्षांपासून ज्या प्रकारे आयपीएल झाले, मला वाटले की, मला योग्य वागणूक दिली गेली नाही. त्यामुळे मी विचार केला की, ठीक आहे खेळ आणि आयपीएलसाठी एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला तो सन्मान मिळाला नाही, ज्याचे तुम्ही हक्कदार होता. त्यावेळी मी म्हणालो की, बास, मी यामध्ये प्रवेश करण्याचा विचारच करणार नाही. त्यामुळे मी हे तसेच सोडले. क्रिकेटनंतर नेहमीच आयुष्य असते, त्यामुळे मी त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.”
गेल शेवटचा वेस्ट इंडिज संघासाठी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबू धाबी येथे शेवटचा सामना खेळला होता. याव्यतिरिक्त त्याने बांगलादेश प्रीमिअर लीग २०२२मध्ये १८ फेब्रुवारी रोजी शेवटचा टी२० क्रिकेट सामना खेळला होता.
आयपीएलमध्ये खेळताना गेलने स्पर्धेतील सर्वात महान खेळाडू म्हणून आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण १४२ सामने खेळताना ३९.७२च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तब्बल ६ शतके आणि ३१ अर्धशतकेही झळकावली आहेत. यासह तो सर्वाधिक धावा करणारा आयपीएल इतिहासातील सातव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उलट्या दिशेने धावताना बटलरने हवेत झेपावत चक्क एका हाताने घेतला कॅच, फलंदाजानेही धरलं डोकं
ज्याच्या वेगाचं सर्वत्र कौतूक होतंय, त्या उमरान मलिकबद्दल आरपी सिंगचं वक्तव्य विचार करायला लावणारं