---Advertisement---

जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video

On: सोमवार, मे 16, 2022 2:38 PM
Riyan-Parag-Jos-Buttler
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ६३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने २४ धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात राजस्थानच्या जोस बटलर आणि रियान पराग यांनी एक जबरदस्त झेल घेतला. त्यांच्या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बटलर-परागने केले कृणालला बाद
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) संघासमोर १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सकडून कृणाल पंड्या (Krunal Pandya) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. पण त्याला खास काही करता आले नाही आणि तो २५ धावांवर बाद झाला. त्याचा अप्रतिम झेल बटलर (Jos Buttler) आणि परागने (Riyan Parag) घेतला.

झाले असे की, १४ व्या षटाकात राजस्थानकडून आर अश्विन (R Ashwin) गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर कृणालने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करत असलेला बटलर धावत आला आणि त्याने सीमारेषेजवळ तो चेंडू पकडला. पण, त्याच्या लक्षात आले की, तो धावण्याच्या लयीत सीमारेषेपार जाऊ शकतो. त्यामुळे त्याने लाँग-ऑफपासून पळत आलेल्या परागच्या दिशेने चेंडू फेकला. परागनेही चूक न करता वर उडी मारत दोन्ही हातांनी तो चेंडू झेलला. त्यामुळे कृणालला माघारी परतावे लागले.

https://twitter.com/Cricupdates2022/status/1525892439017680896

https://twitter.com/SubhamDas2000/status/1525891272736591873

कृणालच्या आधी लखनऊने पहिल्या तिन्ही फलंदाजांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण, त्यानंतर कृणाल आणि दीपक हुडा यांनी चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत डाव सावरला होता. पण, त्यांची भागीदारी रंगत असतानाच कृणाल बाद झाला. नंतर हुडाने ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. पण, तोही १६ व्या षटकात बाद झाला.

मार्कस स्टॉयनिसने २७ धावांची छोटेखानी खेळी केली. पण अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे लखनऊचा डाव २० षटकात ८ बाद १५४ धावांवर संपुष्टात आला. राजस्थानकडून ओबेड मॅकॉय, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जैयस्वालने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार संजू सॅमसनने ३२ आणि देवदत्त पडीक्कलने ३९ धावा केल्या. अन्य फलंदाजांनीही छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे लखनऊकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

हिला डाला ना! ओडियन स्मिथ इतका जोरात शिंकला की, पंजाबचे खेळाडू धडाधड कोसळले, Video व्हायरल

मैदानावरील ‘अवलिया’ वॉर्नचे मैदानाबाहेरील आयुष्य राहिले वादग्रस्त; ‘या’ ५ गोष्टींची झाली सर्वाधिक चर्चा

आयपीएल २०२२ मध्ये इतिहासातील सर्वाधिक षटकारांची बरसात; ‘या’ संघाने सर्वाधिक चेंडू केले सीमापार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---