राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने आयपीएल २०२२ हंगामातील पहिले शतक ठोकले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ६८ चेंडूत राजस्थान रॉयल्ससाठी १०० धावा केल्या. राजस्थानने या सामन्यात २३ धावा शिल्लक ठेऊन विजय मिळवला. या पराभवानंतर बटलर आणि युजवेंद्र चहल यांच्यात चर्चा झाली. यावेळी बटलरने युजवेंद्र चहलच्या दबावामुळे तो शतक करू शकला, असे वक्तव्य करत चहलची फिरकी घेतली.
आयपीएलमधील बटलरचे हे दुसरे शतक ठरले. मुबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर खास व्हिडिओ पोस्ट केला गेला, ज्यामध्ये जोस बटलर (Jos Buttler) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चर्चा करत आहेत. बटलर म्हणतो, “नक्कीच, तू यावर्षी जेव्हापासून आला आहे, तेव्हापासून सलामीच्या स्थानासाठी दबाव टाकत आहे. तुला बाहेर करण्यासाठी काही धावा करण्याची गरज होती.”
स्वतःच्या शतकी खेळीविषयी बोलताना बटलर म्हणाला, “आज खरच मजा आली. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फलंदाज करत असता, तेव्हा तेव्हा तुम्ही याचा तपास लावण्याचा प्रयत्न करता की, चांगली धावसंख्या काय असेल आणि मला वाटते की आम्ही चांगली धावसंख्या केली.”
Batting masterclass ⚡️
Almost a hat-trick 👌
A clinical victory 👏@yuzi_chahal chats with Mr. Centurion @josbuttler whose dominating 💯 powered @rajasthanroyals to their 2⃣nd win in the #TATAIPL 2022. 👍 👍 – By @ameyatilakFull interview 🎥 🔽 #MIvRRhttps://t.co/vgLUjHuwi7 pic.twitter.com/SxQAzAIzNr
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
बटलरने केलेल्या शतकादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार निघाले. चहलच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर या फिरकी गोलंदाजानेही राजस्थानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. चहलने ४ षटकांमध्ये २६ धावा खर्च केल्या आणि २ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याच्याकडे विकेट्सची हॅट्रिक करण्यासाठी चांगली संधी होती, पण करुण नायरने सोपा झेल सोडल्यामुळे त्याची हॅट्रिक हुकली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला मुंबई इंडियन्स संघ मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा करू शकला. परिणामी त्यांना २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.