इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्या मैदानातील प्रदर्शासोबतच त्याच्या राहणीमान आणि खास अंदाजासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर देखील तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशात सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर देखील दिसत आहे.
भारतीय युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याआधी देखील इंस्टाग्रामवर ट्रेंड्स फॉलो करताना दिसला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. श्रेयस जरी मनोरंजनासाठी या सर्व गोष्टी करत असला, तरी त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर (Shresta Iyer) मात्र एक प्रोफेशनल डांसर आहे. श्रेष्ठाला इंस्टाग्रामवर ५० हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
श्रेष्ठाने शुक्रवारी (दि. २० मे) तिचा भाऊ श्रेयससोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला. या व्हिडिओत दोघे बहीण भाऊ ‘जिगल जिगल’ या गाण्यावर डान्स करत आहेत. हा एक सथ्या सर्वत्र चर्चेत असलेला इंस्टाग्राम ट्रेंड आहे. या गाण्यावर अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी व्हिडिओ बनवले आहेत. श्रेयस आणि त्याच्या बहिणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
श्रेयस अय्यरने यापूर्वी युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत देखील एक डान्स व्हिडिओ बनवला होता. धनश्रीने शेअर केलेल्या व्हिडिओवर आतापर्यंत वीस लाखापेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२ हंगामात श्रेयसच्या नेतृत्वातील केकेआर अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. परंतु याचा परिणाम श्रेयसच्या एकंदरीत अंदाजावर पडल्याचे कुठेच दिसत नाही. केकेआरने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात श्रेयसवर सर्वाधिक बोली लावली आणि त्याला खरेदी केले होते. श्रेयसच्या रूपात संघाला चांगला कर्णधार मिळाला, पण तो संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकला नाही.
चालू हंगामात केकेआरने खेळलेल्या १४ सामन्यांपैकी फक्त ६ सामने जिंकले आहेत. परिणामी प्लेऑफच्या शर्यतीतून त्यांचा संघ बाहेर पडला. असे असले, तरी श्रेयसचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र चांगले राहिले आहे. त्याने चालू हंगामातील १४ सामन्यांमध्ये वैयक्तिक ४०१ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फोडल्यानंतर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘माझ्यात डेविड वॉर्नर घुसलेला’
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत शिवन त्यागीचा सनसनाटी विजय
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत शिवन त्यागीचा सनसनाटी विजय