---Advertisement---

इंस्टाग्रामवर व्यंकटेश आणि तेलुगु अभिनेत्रीचे ‘क्यूट’ चॅट व्हायरल; चाहते म्हणे, ‘यांच्यात काहीतरी शिजतय’

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 5:53 PM
Venkatesh-Iyer-Priyanka-Jawalkkar
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शानदार झाली असून १० संघांमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. केकेआरने आत्तापर्यंत २ वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. यावर्षी संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसून येत आहे. मात्र सध्या केकेआर संघाचा धडाकेबाज फलंदाज व्यंकटेश अय्यर प्रचंड चर्चेत आहे. त्याने तेलुगु अभिनेत्रीच्या फोटोवर प्रतिक्रीया दिल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्यंकटेश अय्यरने केकेआरकडून खेळण्यास सुरुवात केली आणि खुप कमी काळात शानदार कामगिरी केली आहे. एका वर्षापेक्षा कमी काळात त्याने भारतीय संघात पदार्पण केले. तो सध्या भारताच्या टी२० बरोबरच एकदिवसीय संघाचा देखील भाग आहे. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो, परंतु त्याने तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवालकरच्या (Priyanka jawalkar) फोटोवर कमेंट केल्याने तो सगळीकडे झळकत आहे.

https://www.instagram.com/p/Cb1e5yNpDwp/?utm_medium=copy_link

प्रियंकाच्या पोस्टवर व्यंकटेशने प्रतिक्रीया दिल्यानंतर तेलुगु अभिनेत्रीने त्याच्यावर उत्तरही दिले. नंतर चाहत्यांनी त्या चॅटची मजा घ्यायला सुरुवात केली. काही चाहत्यांनी तर लिहिले की असे वाटत आहे की या दोघांच्या मध्ये काहीतरी चालले आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केली, त्यावर व्यंकटेश म्हणाला ‘क्यूट’.

त्यानंतर काही वेळ न घालवता प्रियांकाने उत्तर दिले की, ‘कोण? तु?’ त्याच्या या प्रतिक्रीयेला ११ हजारांहून अधिक लाइक्स आल्या आहेत, तर दोन हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

प्रियंकाने २०१७ साली अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आत्तापर्यंत ती तेलुगु चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि आपले नव-नविन फोटो शेअर करत असते.

कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या सामन्यात सीएसकेला ६ विकेट्सने पराभूत केले. तर दूसऱ्या सामन्यात संघाला अपयश आले, आरसीबीने संघाला तीन विकेट्सने पराभूत केले. तसेच तिसऱ्या सामन्यात केकेआरने पंजाबला पराभूत केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’

हैदराबादच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी आवेश खानने बनवली होती अशी योजना, स्वत: केला खुलासा

रोनाल्डो बनून झोपेतून उठला तर काय करणार? विराटने दिले मजेशीर उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---