---Advertisement---

IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल कोलकाता वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Shreyas-Iyer-Rishabh-Pant
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेत रविवारी (१० एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. रविवारी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होईल. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा हा हंगामातील ५ वा सामना आहे, तर दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा चौथा सामना आहे. 

कोलकाताने आत्तापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच दिल्लीने आत्तापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला असून दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.

असे असू शकतात संभावित संघ 
आयपीएलच्या १५ व्या हंगामात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्यामुळे २०२१ पर्यंत दिल्लीकडून खेळणारा श्रेयस रविवारी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध खेळताना दिसणार आहे. या सामन्यासाठी कोलकाताच्या संभावित ११ जणांच्या (KKR Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर मागील काही सामन्यांप्रमाणेच सलामीला फलंदाजी करू शकतात.

तसेच कोलकाताची मधली फळी कर्णधार श्रेयससह यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स, नितीश राणा सांभाळताना दिसू शकतात. तर अष्टपैलूच्या भूमिकेत आंद्रे रसेल आणि सुनील नारायण दिसण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजी फळी पॅट कमिन्ससह उमेश यादव, वरूण चक्रवर्ती यांना सांभाळावी लागेल. यामध्ये त्यांना रविवारी रसिक सलामचीही साथ मिळू शकते.

दिल्ली कॅपिटल्सच्या बाबत बोलायचे झाल्यास संघ आत्तापर्यंत काहीसा संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा विजयी पथावर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या चौथ्या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या (MI Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी सलामीला दिसू शकते. तर मधल्या फळी कर्णधार रिषभ पंतसह रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव दिसू शकतात.

त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून अक्षर पटेल असेल. त्याच्यावर फिरकी गोलंदाजीचीही जबाबदारी असेल. याबरोबरच गोलंदाजी फळीत शार्दुल ठाकूर कुलदीप यादव, मुस्तफिझुर रहामान आणि एन्रीच नॉर्किया यांना संधी मिळू शकते.

आमने-सामने 
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आत्तापर्यंत २९ सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यामध्ये दिल्लीने १२ वेळा विजय मिळवले आहेत. तसेच कोलकाताने १६ विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

हवामान आणि खेळपट्टी 
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यातील सामना ब्रेबॉर्न स्टेडियम ( Brabourne Stadium, Mumbai) येथे होणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांना मदत मिळते. तसेच हा सामना दुपारी होणार असल्याने दवाचाही परिणाम जास्त जाणवणार नाही. त्याचबरोबर फलंदाजांना जर संयम ठेवून फलंजादी केली, तर ते गोलंदाजांवर वर्चस्व ठेवू शकतात. त्याचबरोबर या मैदानावर गोलंदांजाना त्यांची चेंडूचा टप्पा आणि दिशा योग्य ठेवावी लागेल. तसेच आत्तापर्यंतचे आयपीएल २०२२ मधील निकाल पाहाता नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरू शकते.

या सामन्यादरम्यान मुंबईतील हवामान उष्ण राहाणार आहे.  तापमान जवळपास ३१ डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता असून साधारण ५३ टक्के आद्रता असेल, तर ताशी १८-१९ किमीने वारा वाहिल.

आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) कोलकाता विरुद्ध दिल्ली (KKR vs DC) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

१. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना १० एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.

२. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळवला जाईल.

३. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी ३.०० वाजता नाणेफेक होईल.

४. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दिल्ली कॅपिट्स संघ: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रोवमन पॉवेल, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, एन्रिच नोर्किया, मनदीप सिंग, मिशेल मार्श, श्रीकर भरत, टिम सिफर्ट, लुंगी एन्गिडी, अश्विन हेब्बर, प्रवीण दुबे, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, चेतन साकारिया, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, ऍरोन फिंच, मोहम्मद नबी, शेल्डन जॅक्सन, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, शिवम मावी, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.

महत्त्वाच्या बातम्या – 

इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल

भारताच्या ‘जावया’ची आयपीएलमध्ये थाटात एन्ट्री; मुंबईच्या मॅचविनर पठ्ठ्याला चित्त्याच्या चपळाईने केले रनआऊट

‘हिटमॅन’ने भल्या-भल्या खेळाडूंना ‘या’ विक्रमात टाकले मागे; बनला मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---