मुंबई| गुरुवारी रोजी (३१ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. उभय संघांचा हा हंगामातील दुसरा सामना असेल. दोन्ही संघ हा सामना जिंकत हंगामातील आपला विजय नोंदवण्यासाठी आणि गुणतालिकेतील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतील.
असे असू शकतात संभावित संघ
चेन्नईकडून या सामन्यातही त्यांचा सर्वात महागडा वेगवान गोलंदाज दिपक चाहर खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र चेन्नईचा हुकुमी एक्का मोईन अलीचे या सामन्यातून पुनमरागमन होईल. त्याला मिशेल सॅंटनरच्या जागी संधी दिली जाऊ शकते. जर कर्णधार जडेजाने सँटनरला बाहेर न करण्याचा निर्णय घेतला तर, पहिल्या सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या डेवॉन कॉन्वेला बाकावर बसावे लागू शकते. याव्यतिरिक्त चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजून कोणता बदल दिसू शकत नाही.
लखनऊ संघाबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यातही त्यांना त्यांचे प्रमुख परदेशी खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि जेसन होल्डर यांची उणीव भासेल. तसेच मार्क वुडच्या जागी संघात सहभागी केला गेलेल्या एँड्य्रू टायच्या उपलब्धतेबद्दलही शंका आहे. जर तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल, तर त्याला नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले जाईल. त्याचे पुनरागमन झाल्यास मोहसिन खानला संघाबाहेर बसावे लागू शकते. उर्वरित संघ मागील सामन्याप्रमाणेच असू शकतो.
खेळपट्टी आणि हवामान
ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल. या मैदानावरील अधिकतर सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. या हंगामात या मैदानावर एकच सामना खेळवला गेला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. तरीही त्यांनी हा सामना गमावला होता. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने १० चेंडू शिल्लक असताना १७९ धावा करत सामना जिंकला होता. तसेच योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनाही या खेळपट्टीकडून मदत मिळू शकते.
हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, गुरुवारी (३१ मार्च) मुंबईमध्ये पावसाची कसलीही शक्यता नाही. तसेच तापमान २५ ते ३३ डिग्रीच्या आसपास असेल. सुरुवातीला खेळाडूंना गरमी होऊ शकते. मात्र नंतर तापमान कमी होईल आणि खेळपट्टीवर दव पडतील. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला समस्या होऊ शकतात.
आयपीएल २०२२ हंगामातील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना ३१ मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
असे असू शकतात संभाव्य संघ-
लखनऊ सुपरजायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मोहसिन खान/एँड्य्रू टाय, आयुष बदोनी, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ऍडम मिल्ने, तुषार देशपांडे.
महत्त्वाच्या बातम्या-
CSK vs LSG | केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही
कर्णधार डू प्लेसिसने कार्तिकला म्हटले धोनीसारखे ‘कूल’, उधळली स्तुतीसुमने; वाचा स्टेटमेंट
केकेआरविरुद्ध थरारक विजय मिळवूनही आरसीबीचा कर्णधार नाराज, ‘या’ गोष्टीचं वाटतंय वाईट