दिल्ली कॅपिटल्स संघ आणि त्यांचे सर्व चाहते जवळपास १५० किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची आतुरतेने वाट पाहत होते. तो गोलंदाज म्हणजे एन्रीच नॉर्किया होय. त्याने दिल्लीकडून आयपीएल २०२२मधील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध गुरुवारी (०७ एप्रिल) खेळला. मात्र, त्याची ही कामगिरी कदाचित कोणताही चाहत्याला लक्षात ठेवावी वाटणार नाही. दुखापतीमुळे जवळपास ४ महिन्यांच्या ब्रेकनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणारा नॉर्किया या सामन्यात केवळ १४ चेंडूच टाकू शकला होता. तेव्हाच त्याला पंचांनी गोलंदाजी करण्यापासून हटवले. दरम्यान नॉर्कियाच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकने मारलेला षटकार पाहून प्रत्येकाच्याच भुवया उंचावल्या.
एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) या सामन्यात फक्त २ षटके आणि २ चेंडू टाकू शकला. दोन बीमर (कमरेच्या वर टाकलेला चेंडू) टाकल्यानंतर पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. नॉर्कियाने हे दोन्ही बीमर लखनऊच्या क्विंटन डी कॉकला (Quinton De Kock) मारले. तरीही त्यातील एक चेंडू डी कॉकच्या बॅटला लागून स्लीपच्या वरून षटकार गेला. डी कॉकने नॉर्कियाच्या पहिल्याच षटकात १९ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) त्याला गोलंदाजीवरून बाजूला केले. नॉर्कियाच्या पहिल्याच षटकात डी कॉकने ४, ४, ३, ०, ६ आणि १ अशा धावा केल्या. हे दिल्लीच्या डावातील पाचवे षटक होते.
https://twitter.com/mohitherapy/status/1512130311101968387?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512130311101968387%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcdn.embedly.com%2Fwidgets%2Fmedia.html%3Ftype%3Dtext2Fhtmlkey%3Dcb7145f1731b4c328f8e4d2201854ceaschema%3Dtwitterurl%3Dhttps3A%2F%2Ftwitter.com%2Fmohitherapy%2Fstatus%2F1512130311101968387image%3Dhttps3A%2F%2Fabs.twimg.com%2Ferrors%2Flogo46x38.png
यानंतर नॉर्कियाला १४व्या षटकात गोलंदाजीसाठी बोलावण्यात आले. दवामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजांसाठी चेंडूवर पकड मिळवण्यात अडचण येत होती. षटकाचा पहिलाच चेंडू बीमर होता. हा चेंडू जवळपास १४१ किमी प्रति तास वेगाचा होता. डी डॉक कसा तरी या चेंडूवर आपली बॅट मध्ये घातली आणि चेंडू थेट सीमारेषेपलीकडे जाऊन पडला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नो बॉलवर लागलेल्या षटकारासह या षटकात नॉर्कियाने एकूण १४ धावा दिल्या.
नॉर्कियाला तिसऱ्या षटकासाठी जेव्हा पंतने गोलंदाजी दिली, तेव्हा त्याने आणखी बीमर चेंडू फेकला. त्यानंतर त्याला पंचांनी गोलंदाजी करण्यावरून हटवले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यावेळी गांगुली म्हणालेला सचिनला बाद केलस, आता हे लोक तुला मारतील’, शोएब अख्तरचा खुलासा
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक