---Advertisement---

लखनऊ, अहमदाबाद फ्रँचायझींचा अधिकृत मंजूरी, पण खेळाडू निवडण्यासाठी मिळणार किती वेळ? घ्या जाणून

On: बुधवार, जानेवारी 12, 2022 11:31 PM
IPL-Trophy
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग (IPL) २०२२ मध्ये आठ नाही, तर दहा संघ खेळताना दिसणार आहेत. आयपीएल संचालन परिषदेने मंगळवारी (११ जानेवारी) टी२० लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी लखनऊ आणि अहमदाबाद या नविन आईपीएल फ्रँचायझींना अधिकृतपणे इरादा पत्र जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरपीएसजी समुह आणि खाजगी गुंतवणुक फर्म सीवीसीने गेल्या ऑक्टोंबरमध्ये अनुक्रमे लखनऊ आणि अहमदाबाद या फ्रँचायझीसाठी यशस्वीपणे बोली लावली होती. सीवीसीचे भारताबाहेरील सट्टेबाजी कंपन्यांमध्ये संबंध असल्याचे समोर आल्यामुळे इरादा पत्र देण्यास विलंब झाला.

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सीवीसीच्या बोलीला मंजूरी देण्यापुर्वी कायदेशीर गटाच्या मदतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात वेळ घेतला. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी बैठकीनंतर पीटीआईला म्हटले की, “संचालन परिषदेने आज बोलींना मंजुरी दिली आहे. लवकरच इरादा पत्र जारी केले जाईल. संचालन परिषद लिलावापुर्वी नव्या फ्रँचायझींना खेळाडूंची निवड करण्यासाठी १० ते १४ दिवस अवधी देण्याचा विचार करत आहे.”

व्हिडिओ पाहा-

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

पुढे पटेल म्हणाले की, “आम्ही नविन संघाशी बोलत आहोत. त्यांना १० दिवस ते दोन आठवड्यांचा कालावधी देण्याचा विचार करत आहेत. मात्र लिलावाची दिनांक आणि ठिकाण यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.”

इरादा पत्र देण्याचा अर्थ असा आहे की, औपचारीकरित्या हे दोन्ही संघ आयपीएलचा भाग होतील. त्यांना १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे होणाऱ्या लिलावाच्या अगोदर खेळाडू निवडण्याचा अधिकार मिळेल. दोन्ही संघांनी आपले सहकारी कर्मचारी निवडले आहेत. ते लिलावापुर्वी तीन खेळाडूंना करारबद्ध करु शकतात. भारताचा महान फलंदाज केएल राहुलला लखनऊ तर अष्टपैलू हार्दिक पंड्याला अहमदाबादची कमान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोविड-१९ ची तिसरी लाट भारतात सुरु झाली आहे, त्यामुळे बीसीसीआई एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आईपीएल स्पर्धेचे एकाच राज्यात संपुर्ण आयोजन करण्यासह इतर पर्यायांच्या शोधात आहे. आयपीएल अध्यक्ष म्हणाले की, “आताच याबाबतीत कोणताही निर्णय घेणे घाईचे असेल. आम्हाला भारतात खेळायला आवडेल. पण आम्हाला परिस्थिती पहावी लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल, स्मिथने चँपियन कर्णधार विलियम्सनला पछाडले; तर जेमिसनचीही मोठी झेप

हे काय? कॅच सुटला, मग चेंडू मैदानावरील हेल्मेटला धडकला अन् द. आफ्रिकेला फुकटात मिळाल्या चक्क ५ धावा

दणक्यात साजरा झाला वामिकाचा पहिला वाढदिवस, बर्थडे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हेही पाहा-

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---