---Advertisement---

IPL | बांग्लादेशाच्या ‘या’ खेळाडूसाठी गंभीर बनलाय अधिक ‘गंभीर’, थेट राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला लावला फोन

On: सोमवार, मार्च 21, 2022 4:59 PM
Gautam-Gambhir
---Advertisement---

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याला आयपीएल २०२२ हंगामासाठी लखनऊ सुपर जायंट्सने ७.५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वुडच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि याच कारणास्तव त्याने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता मार्क वुडच्या जागी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदला संघात सामील करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स प्रयत्नात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Supergaints) संघाने मार्क वुड (Mark Wood) खेळणार नसल्यामुळे बांगलादेशच्या तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याला खेळण्यासाठी ऑफर दिली आहे. पण गोलंदाजाकडून अद्याप उत्तर मिळाले नाहीय.

तसेच अशीही माहिती समोर येत आहे की, लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने तस्कीनला आयपीएलमध्ये उपलब्ध करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डला (BCB) फोन देखील केला होता. बांगलादेश संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तस्कीन देखील संघासोबतच आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

जर तस्कीनने आयपीएलमध्ये लखनऊ संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला, तर आधी ठरेलल्या वेळपेक्षा लवकर दक्षिण अफ्रिकेतून भारतासाठी त्याला रवाना व्हावे लागेल. अंतिम निर्णय घेण्यासाठी त्याने लखनऊ संघाकडे थोडा वेळ मागितला असल्याची माहिती आहे. बीसीबीच्या एका अधिकाऱ्याने त्यांच्या खेळाडूंनी आयपीएल खेळण्याविषयी मत मांडले. ते म्हणाले, “फ्रेंचायझी क्रिकेट आता वास्तविकता बनले आहे. तुमची इच्छा असली, तरी तुम्ही एखाद्या खेळाडूला जाण्यापासून अडवू शकत नाही.”

तस्कीनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत १० कसोटी, ४७ एकदिवसीय आणि ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. या तिन्ही प्रकारांमध्ये त्याने अनुक्रमे २३, ६२ आणि २३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. आगामी हंगामात जर तो खेळला, तर हा त्याचा पहिला आयपीएल हंगाम असेल.

लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ –
केएल राहुल (कर्णधार), इविन लुईस, मनन वोहरा, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा, कृणाल पंड्या, काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, अंकित राजपूत, आवेश खान, दुष्मंथा चमीरा, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई, शाहबाज नदीम.

महत्वाच्या बातम्या – 

आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम

दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या खेळाडूंसह पाँटिंग रोज करतोय दोन वेळचं जेवण, ‘हे’ आहे कारण 

षटकारांच्या ‘या’ शानदार विक्रमात सीएसकेचा धोनीच ‘सिक्सर किंग’, विस्फोटक गेल टॉप-५मध्येही नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---