पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना शनिवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाणार आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघ आणखीनच खास करणार आहेत. कारण खेळाडू त्यांच्या जर्सीच्या पाठीवर त्यांच्या आईचे नाव लिहिणार आहेत.
जगभरात दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार आंतरराष्ट्री मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी तो ८ मे रोजी साजरा केला जाणार आहे. याच मातृदिनाचे औचित्य साधून लखनऊ सुपर जायंट्स संघ शनिवारी आईचे नाव असलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. याबद्दल लखनऊने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
लखनऊची जर्सी आकाशी रंगाची आहे. पण शनिवारी लखनऊने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काहीशी फिकट राखाडी रंगाची जर्सी दिसत असून त्यावर खेळाडूंच्या जर्सी क्रमांकाखाली त्यांच्या आईचे नाव दिसत आहे. खेळाडूंचा जर्सी क्रमांक आणि आईचे नाव केशरी रंगात छापल्याचे दिसत आहे.
तसेच या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनवरून समजते की, लखनऊचे खेळाडू जगभरातील मातांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जर्सीवर त्यांच्या आईचे नाव लिहिणार आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माँ, हे तुझ्यासाठी आहे. मातृदिनाची तयारी.’ या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून या कृतीचे कौतुक होत आहे.
साधारणत: क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीच्या पाठीवर त्यांच्या जर्सीक्रमांक आणि त्यांचे पहिले नाव किंवा अडनाव लिहिलेले असते. पण, लखनऊ संघातील खेळाडू आईच्या सन्मानासाठी एक दिवस आईचे नाव लिहिलेली जर्सी परिधान करणार आहेत (wear jerseys with their mother’s name).
“This one’s for you, Maa.”
Now THAT’s how you prepare for Mother’s Day – the #SuperGiant way! #AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/H4CNkJZ6LF— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 7, 2022
भारतीय संघानेही केले होते असे
क्रिकेटमध्ये जर्सीवर आईचे नाव छापण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी २९ ऑक्टोबर २०१६ रोजी भारत आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना झाला होता. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी त्यांच्या त्यांचे पहिले नाव किंवा अडनावाऐवजी त्यांच्या आईचे नाव असलेली जर्सी परिधान केली होती.
#TeamIndia sporting their mothers' names on the jersey in the 5th and final ODI #INDvNZ pic.twitter.com/pWcMAKMchB
— BCCI (@BCCI) October 29, 2016
भारतीय संघाच्या या कृतीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक झाले होते. स्टार इंडियाच्या ‘नयी सोच’ या उपक्रमाअंतर्गत भारतीय संघाने असे केले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध १० विकेट्स घेताना घातलेल्या जर्सीचा एजाज पटेल करणार लिलाव, ‘हे’ आहे मोठे कारण
“वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्ट्या करायचा, सतत टीममेट्सशी भांडल्यामुळे संघाबाहेरही केले होते”
रोहित शर्माची ताबडतोब फलंदाजी पाहून रणवीर सिंगही झाला खुश; फॅनप्रमाणे करू लागला चीअर