Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताविरुद्ध १० विकेट्स घेताना घातलेल्या जर्सीचा एजाज पटेल करणार लिलाव, ‘हे’ आहे मोठे कारण

भारताविरुद्ध १० विकेट्स घेताना घातलेल्या जर्सीचा एजाज पटेल करणार लिलाव, 'हे' आहे मोठे कारण

May 7, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Ajaz-Patel

Photo Courtesy: Twitter/ICC and Instagram/Ajaz Patel


न्यूझीलंड क्रिकेट संघ गेल्यावर्षी भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारताविरुद्ध त्यांनी वानखेडे स्टेडियमवर देखील कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला होता. पण असे असतानाही चर्चा झाली ती केवळ न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलचीच. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात भारताच्या सर्व १० विकेट्स घेतल्या होत्या. आता एजाज पटेल याच सामन्यातील जर्सीचा लिलाव करणार आहे.

गेल्यावर्षी ३ ते ६ डिसेंबरदरम्यान झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) कसोटी सामन्यात फिरकीपटू एजाज पटेलने भारताच्या पहिल्या डावातील सर्व १० विकेट्स (10-wicket haul) घेत इतिहास रचला होता. तो कसोटीत एका डावात सर्व १० विकेट्स घेणारा तिसराच गोलंदाज ठरला होता. यापूर्वी असा कारनामा इंग्लंडच्या जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे यांनीच केला आहे.

विशेष गोष्ट अशी की एजाज पटेलही (Ajaz Patel) भारतीय मुळचा असून त्याचा जन्म मुंबईतील आहे. पण लहानपणीच तो त्याच्या पालकांसह न्यूझीलंडला स्थायिक झाला. त्यामुळे त्याच्या जन्म शहरातच त्याने हा १० विकेट्सचा विक्रम केला होता. त्यामुळे तो त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला होता.

आता एजाज पटेलने या सामन्यातील जर्सीचा लिलाव (Jersey in auctions) करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावातून येणारे पैसे तो न्यूझीलंडमधील नॅशनल चिल्ड्रन हॉस्पिटलमधील स्टारशिप रेडियोलॉजी डिपार्टमेंटला देणार आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

त्याने याबद्दल सोशल मीडियावर लिहिले की, ‘हा दिवस खास आहे. लहान मुलांना आणि त्यांच्या परिवाराला मदत करण्यापेक्षा मोठे काही नाही. मला आशा आहे की, लिलावातून शक्य तेवढे जास्त पैसे उभे राहातील.’ या जर्सीवर न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या स्वाक्षरी देखील आहेत. या जर्सीचा लिलाव ११ मे रोजी संपणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajaz Patel (@ajazpatel)

त्याचबरोबर एजाज पटेलने सांगितले की, ज्यावेळी तो आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलीबरोबर हॉस्पिटलमध्ये काही दिवस राहिले होते, तेव्हाचा कठीण काळ होता. त्यावेळी तिथे जाणे त्यांच्यासाठी अद्भुत होते. त्यामुळे आता त्यांना त्यांची मदत करायची आहे.

एजाज पटेलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
एजाज पटेलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे अद्याप वनडे पदार्पण झालेले नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माची ताबडतोब फलंदाजी पाहून रणवीर सिंगही झाला खुश; फॅनप्रमाणे करू लागला चीअर

एकच मारला पण सॉलीड मारला! इशान किशनने तेवतियाला खेचला १०४ मीटरचा षटकार, Video व्हायरल

साई सुदर्शन आयपीएलमध्ये ‘हिट विकेट’ होणारा पहिलाच नाही, ‘हे’ १२  खेळाडूही झालेत असेच आऊट


ADVERTISEMENT
Next Post
Umran-Malik-And-Harbhajan-Singh

उमरान मलिकच्या ताशी १५७ किमी वेगाच्या गोलंदाजीने भज्जीलाही घातली भूरळ; दिग्गज म्हणाला, 'याला थेट...'

लखनऊने जिंकली मनं! आईच्या सन्मानासाठी खेळाडू खास जर्सीसह उतरणार पुण्याच्या मैदानात

Hardik-Pandya

'आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले', पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.