ADVERTISEMENT

उमरान मलिकच्या ताशी १५७ किमी वेगाच्या गोलंदाजीने भज्जीलाही घातली भूरळ; दिग्गज म्हणाला, ‘याला थेट…’

उमरान मलिकच्या ताशी १५७ किमी वेगाच्या गोलंदाजीने भज्जीलाही घातली भूरळ; दिग्गज म्हणाला, 'याला थेट...'


क्रिकेट म्हणलं की, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात काट्याची टक्कर असते. फलंदाज गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी करण्याच्या हेतूने मैदानात उतरतात, तर गोलंदाजांचाही फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना तंबूत धाडण्याचा मानस असतो. क्रिकेट प्रकार कुठलाही असू द्या, त्यात ही काट्याची टक्कर नेहमीच पाहायला मिळते. यात कदाचित वेगवान गोलंदाजांवर जरा जास्तच लक्ष असतं. कारण, जेवढा जास्त वेग, तेवढा गोलंदाजांना अधिक फायदा. सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा थरार सुरूये. अशात, एकापेक्षा एक गोलंदाज आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहेत. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा.

उमरान मलिक (Umran Malik) याने गुरुवारी (दि. ०५ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) खेळताना ताशी १५७ किमी वेगाने गोलंदाजी केली. हा आयपीएल इतिहासातील (Fastest Ball In IPL History) सर्वात वेगवान चेंडूंपैकी एक होता. तसेच, या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. यामुळेच आता जम्मू- काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी मागणी केली जात आहे. माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा असा विश्वास आहे की, उमरानला आगामी टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला घेऊन गेले पाहिजे.

उमरान आता फक्त २२ वर्षांचा आहे. तो ताशी १५० हून अधिक किमी वेगाने सहजरीत्या गोलंदाजी करत आहे. या हंगामात त्याने हैदराबादकडून खेळताना आतापर्यंत १५ विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक १९ विकेट्ससह राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी बनलाय. हैदराबाद संघाने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी उमरानला ४ कोटी रुपयांमध्ये संघात रिटेन केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हरभजन सिंगचे वक्तव्य
माध्यमांशी बोलताना हरभजन म्हणाला की, “उमरान माझा आवडता गोलंदाज आहे. मला त्याला भारतीय संघाकडून खेळताना पाहायचंय. कारण, तो एक शानदार गोलंदाज आहे. असा कोणताही गोलंदाज नाहीये, जो ताशी १५०हून अधिक किमी गतीने गोलंदाजी करत आहे. तसेच, देशासाठी खेळत नाहीये.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते की, ते चांगले होईल आणि तरुणांनाही प्रेरणा मिळेल. जिथून तो आलाय, तेथील युवा खेळाडूही क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित होतील. तो आयपीएलमध्ये जे काही करतोय ते अविश्वसनीय आहे.”

“त्याची निवड होईल की, नाही हे मला माहीत नाही, पण मी निवड समितीचा भाग असतो, तर मी त्याचा समावेश केला असता. उमरान मलिकने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी केली पाहिजे,” असेही पुढे बोलताना हरभजन म्हणाला.

उमरान मलिकची आयपीएल कारकीर्द
उमरान मलिकने आतापर्यंत १३ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८.७च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत १७ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, यादरम्यानची त्याची सर्वोत्तम कामगिरी २५ धावा देत ५ विकेट्स घेणे ही आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम

आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय


ADVERTISEMENT
Next Post