---Advertisement---

शानदार विजयानंतर लखनऊच्या खेळाडूंचा हटके अंदाजात जल्लोष; पण कोपऱ्यात उभ्या असलेल्या गंभीरला झालं तरी काय?

On: सोमवार, मे 2, 2022 10:16 PM
Lucknow-Super-Giants
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्स चांगले प्रदर्शन करत आहे. रविवारी (दि. ०१ मे) लखनऊने चालू हंगामातील त्यांचा सातवा विजय मिळवला. या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला ६ धावांच्या अंतराने पराभूत केले. या विजयानंतर लखनऊ प्लेऑफ फेरीच्या अधिक जवळ पोहोचला आहे. १४ गुणांसह त्यांचा संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिल्लीला पराभूत केल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंनी अनोख्या अंदाजात जल्लोष केला.

लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून विजायनंतर त्यांच्या खेळाडूंनी साजरी केलेल्या आनंदाची माहिती दिली केली. फ्रँचायझीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ विजयाच्या आनंदात गाणे म्हणत आहेत. अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) सहीत काही खेळाडूंच्या हातात मोबाईल दिसत आहे. मोबाईलमध्ये पाहून हे सर्वजण गाणे म्हणत आहेत. काही खेळाडू जेवणावरील झाकण दोन्ही हातात घेऊन वाजवत आहेत. कर्णधार केएल राहुल (KL Rahul), आवेश खान आणि संघातील इतर खेळाडू या जल्लोषात उस्फूर्तपणे सहभाग घेत आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लखनऊने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कृणाल पांड्याची पत्नी पंखूडी शर्माने देखील व्हिडिओवर कमेंट केली आहे. वेगवेगळी मते व्यक्त करणाऱ्या चाहत्यामध्ये काहीजण असे आहेत, ज्यांनी गौतम गंभीरविषयी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओत संघाचा मेंटॉर गंभीर दिसत आहे, पण तो या जल्लोषात उत्फूर्तपणे सहभाग घेत नाहीये. एक चाहत्याने कमेंट करून लिहिले की, “गंभीर विजयानंतर देखील एवढा गंभीर!”, तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “गौतम गंभीरला नेमके काय झाले आहे?”

https://www.instagram.com/reel/CdBXziAB0zO/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून लखनऊने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य देखील ठरला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ३ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी ६ धावा कमी पडल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

सीएसकेची धुरा सांभाळताच धोनीने मोडला द्रविडचा विक्रम; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय

सुपरमॅन बनत रिझवानचा हवेत एकहाती झेल, अद्भुत कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘या’ क्रिकेटरमध्ये टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवण्याची आहे संधी, स्टेनने दाखवलाय विश्वास 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---