इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून ते २०२२ पर्यंत एकाच संघाकडून खेळणारा असा फक्त एकमेव खेळाडू आहे. तो खेळाडू म्हणजेच विराट कोहली होय. विराट पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाशी जोडला गेला होता. तेव्हापासून तो बेंगलोर संघाकडूनच खेळतोय. यादरम्यान अनेक चढ-उतार आले. मात्र, विराटने संघाची आणि संघाने विराटची साथ कधीच सोडली नाही. तसेच, बेंगलोरने विराटला नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळेच आता बेंगलोरचा माजी कर्णधार राहिलेल्या विराटने संघाचे आभार मानले आहेत.
माध्यमांशी बोलताना विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, “भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त आयपीएलने मला आपली क्षमता दाखवण्याची संधी दिली. मला यामुळे विश्वचषकातील सर्वोत्तम फलंदाजांविरुद्ध स्पर्धा करणे आणि ज्ञान शेअर करण्याची संधी मिळाली. मला वाटते की, ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट होती, ज्यामुळे खेळाप्रति असलेली माझी समज आणखी वाढली. यामुळे मला खूप प्रगतीशील पद्धतीने पुढे जाण्यात मदत मिळाली.”
पुढे बोलताना विराट म्हणाला की, “माझ्यासाठी बेंगलोरची समज ही एक निष्ठा आहे. हे अगदी त्याप्रकारे आहे, ज्याप्रकारे मी माझ्या जीवनाचा मार्ग अवलंबतो. तुम्ही कोणासोबतही आयपीएल जिंकता, पण पाच मिनिटांसाठी आनंदी असता. सहाव्या मिनिटाला तुम्ही इतर समस्यांमुळे अस्वस्थ होऊ शकता, त्यामुळे माझ्यासाठी जग इथेच संपत नाही.”
“फ्रँचायझीने मला पहिल्या तीन वर्षांमध्ये संधी म्हणून जे दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. ते सर्वात खास आहे. जसे की, मी म्हणालो, असे अनेक संघ होते, ज्यांच्याकडे संधी होती, पण त्यांनी माझ्यावर विश्वासच दाखवला नाही,” असेही बेंगलोरबद्दल बोलताना विराट म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये विराटसोबत ड्राफ्टमध्ये प्रदीप सांगवानही होता. त्यावर्षी भारताने मलेशियात १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. तसेच, विराट कोहली त्यावेळी भारताचा कर्णधार होता. दिल्लीकडे विराटला घेण्याची संधी होती. मात्र, त्यांनी प्रदीप सांगवानवर विश्वास दाखवला, तर दुसरीकडे विराट आजही बेंगलोर संघाकडून खेळतोय.
𝗢𝗡𝗘 𝗠𝘂𝘁𝗵𝗼𝗼𝘁 𝗠𝗼𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗗𝗮𝘆 📸
And we’re off to the MCA Stadium for the Southern Derby. 👊🏻@MuthootIndia #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvCSK pic.twitter.com/EzNixi81K8
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 4, 2022
विराटची आयपीएल कामगिरी
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत २१८ सामने खेळताना त्यातील २१० डावात त्याने ३६.५१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४३ अर्धशतकेही केली आहेत.