मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १५ वा सामना गुरुवारी (७ एप्रिल) होणार आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. हा लखनऊ सुपर जायंट्सचा या हंगामातील चौथा सामना असणार आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील तिसरा सामना असणार आहे.
लखनऊने आत्तापर्यंत या हंगामात खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. तसेच दिल्लीने खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना पराभूत झाला आहे.
असे असू शकतात संभावित संघ
आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून स्पर्धेत (IPL 2022) सहभागी झालेला लखनऊ संघ केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्त्वाखाली खेळत आहे. त्यांच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या (LSG Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास यापूर्वीप्रमाणेच कर्णधार केएल राहुलबरोबर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजी करेल. तसेच मधली फळी सांभाळण्यासाठी मनिष पांडे, एव्हिन लुईस, आयुष बदोनी बरोबर अष्टपैलू दिपक हुडा असू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कृणाल पंड्या आणि जेसन होल्डरलाही संघात संधी मिळू शकते. गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई आणि अवेश खानवर असू शकते.
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संभावित ११ जणांच्या (DC Predicted XI) संघाबद्दल बोलायचे झाल्यास डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) संघात आगमन होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लखनऊविरुद्ध पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी खेळताना दिसू शकते. त्याचबरोबर मधल्या फळीत मनदीप सिंगसह कर्णधार पंत, ललित यादव असू शकतात. अष्टपैलू खेळाडू म्हणून रोवमन पॉवेलला संधी मिळू शकते. तर, गोलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया आणि मुस्तफिजूर रेहमान यांच्यावर असू शकते.
आमने-सामने
लखनऊ संघ यावर्षीपासूनच स्पर्धेत नव्याने सामील झाला आहे. त्यामुळे यापूर्वी लखनऊ आणि दिल्ली यांच्यात सामना झालेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) संघातील सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी (DY Patil Sports Academy Mumbai) येथे पार पडणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी, अशा दोन्ही विभागांना मदतगार आहे. तसेच या सामन्यावेळी मुंबईतील वातावरण उष्ण राहिल. तापमान साधारण ३२ डीग्री सेल्सियसच्या आसपास असेल. तसेच ५७ टक्के आद्रता असेल, तर साधारण ताशी ८ किमी वेगाने वारा वाहील.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) लखनऊ विरुद्ध दिल्ली (LSG vs DC) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना ७ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्तफिजुर रहमान, अश्विन हेब्बर, टिम सिफर्ट, मिशेल मार्श, श्रीकर भरत, सरफराज खान, लुंगी एन्गिडी, प्रवीण दुबे, एन्रिच नोर्किया, कमलेश नागरकोटी, चेतन साकारिया, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल.
लखनऊ सुपर जायंट्स संघ: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एव्हिन लुईस, मनिष पांडे, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान, शाहबाज नदीम, मनन वोहरा , दुश्मंथा चमीरा, काइल मेयर्स, अंकित राजपूत, कृष्णप्पा गॉथम, मार्कस स्टॉयनिस, मोहसिन खान, करण शर्मा, मयंक यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा गुरुजी! तीन असे प्रशिक्षक, ज्यांनी संघाला कमीत कमी दोनदा जिंकून दिलीय आयपीएल ट्रॉफी
चेन्नई पुढे मुंबई मागे-मागे, IPLमध्ये दोन्ही संघाबाबत काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात, वाचा…
पॅट कमिन्सचा धमाका, पण कायरन पोलार्डची वादळी खेळी विसरणे कठीणच; पठ्ठ्याने नावावर केलाय नवीन विक्रम






