मुंबई। शुक्रवारी (८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १६ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. पंजाब किंग्स संघासाठी हा हंगामातील चौथा, तर गुजरात टायटन्ससाठी हा हंगामातील तिसरा सामना आहे.
पंजाबने आत्तापर्यंत आयपीएलच्या १५ व्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. तसेच गुजरातने खेळलेल्या दोन्ही पैकी दोन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी या दोन्ही संघातील कोण विजयाची रथ कायम ठेवणार हे पाहावे लागणार आहे.
असे असू शकतात संभावित संघ –
आयपीएलच्या १५ व्या हंगामात मयंक अगरवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या सामन्यात त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात (PBKS Predicted XI) फारसा बदल होण्याची शक्यता वाटत नाही.
मागील काही सामन्यांप्रमाणेच मयंक अगरवाल आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच या सामन्यात जॉनी बेअरस्टो खेळताना दिसू शकतो. त्याला भानुका राजपक्षाच्या जागेवर संधी मिळू शकते. त्याचबरोबर मधल्या फळीत अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा खेळताना दिसू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजीत अष्टपैलू ओडियन स्मिथबरोबर कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव आरोरा आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या अंतिम ११ जणांच्या (GT Predicted XI) संघाबद्दल सांगायचे झाले तर, त्यांच्या संघातही मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करू शकतात. तर मधल्या फळीत डेव्हिड मिलरसह अष्टपैलू विजय शंकर, हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर हे खेळू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, वरुण ऍरॉन आणि मोहम्मद शमी हे महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.
आमने-सामने
गुजरात टायटन्स हा आयपीएलमधील नवा संघ असून १५ व्या हंगामापासून स्पर्धेत सहभागी झाला आहे. त्यामुळे यापूर्वी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स संघात सामना झालेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Punjab Kings vs Gujarat Titans) संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne stadium) सामना होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांना मदतशीर आहे. तसेच या मैदानात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दवाचा परिणाम दिसला होता. पण, नंतर फवारणी केल्यानंतर दवाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले होते. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान मुंबईतील तापमान जवळपास ३१ डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता असून ५३ टक्के आद्रता असेल, तर ताशी ११ किमीने वारा वाहिल.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) पंजाब विरुद्ध गुजरात (PBKS vs GT) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना ८ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील पंजाब विरुद्ध गुजरात सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
पंजाब किंग्ज संघ: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, जॉनी बेअरस्टो, बेनी हॉवेल, संदीप शर्मा, ऋषी धवन, बलतेज सिंग, रितिक चॅटर्जी, प्रेरक मंकड, इशान पोरेल, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, अंश पटेल, राज बावा.
गुजरात टायटन्स संघ: मॅथ्यू वेड, शुबमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, वरुण ऍरोन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, प्रदीप संगवान, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, यश दयाल, नूर अहमद.
महत्त्वाच्या बातम्या –
कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू
दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास