मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २१ वा सामना सोमवारी (१० एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. हा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे सामना होणार आहे. या सामन्यालाभारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ
आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील हैदाराबादची कामगिरी संमिश्र झाली आहे. त्यांनी तीन सामन्यांपैकी पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकरला होता, तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले. त्यामुळे आता हीच विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.
या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या हैदराबाद संघाचा (SRH predicted XI) विचार करायचा झाल्यास युवा अभिषेक शर्मासह कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) सलामीला उतरू शकतात. तसेच मधल्या फळीत खेळण्यासाठी त्यांच्याकडे राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पुरन आणि शशांक सिंग असे पर्याय आहेत. तर अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर असू शकतो. गोलंदाजी फळीत भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, टी नटराजन यांच्यासह उमरान मलिक किंवा कार्तिक त्यागीला संधी दिली जाऊ शकते.
सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पुरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर,भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, टी नटराजन, उमरान मलिक/कार्तिक त्यागी.
असा असू शकतो गुजरात टायटन्सचा संभावित संघ
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या गुजरातसंघ सध्या विजयी रथावर स्वार आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. आता त्यांना हैदराबादविरुद्ध चौथा सामना खेळायचा असून यातही विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या गुजरात संघाबद्दल (GT predicted XI) विचार करायचा झाल्यास याआधीच्या सामन्यांप्रमाणेच शुबमन गिल आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेडकडे सलामीची जबाबदारी सांभाळू शकतात. तसेच मधल्या फळीत साई सुदर्शन, डेव्हिड मिलर यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहर यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खानसह लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नळकांडे यांचा पर्याय असेल.
गुजरात टायटन्सचा संभावित संघ – शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.
अशी असू शकते ड्रीम ११
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans) संघात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११ (Dream XI) बद्दल बोलायचे झाल्यास यष्टीरक्षक म्हणून मॅथ्यू वेडची निवड होऊ शकते. तसेच फलंदाजीसाठी शुबमन गिल, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम यांना संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर यांची निवड होऊ शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खान, टी नटराजन, मोहम्मद शमी यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो. तसेच कर्णधार म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि उपकर्णधार म्हणून शुबमन गिल यांची निवड करता येऊ शकते.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (SRH vs GT) ड्रीम ११
कर्णधार – वॉशिंग्टन सुंदर
उपकर्णधार – शुबमन गिल
यष्टीरक्षक – मॅथ्यू वेड
फलंदाज – शुबमन गिल, केन विलियम्स, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम
अष्टपैलू – अभिषेक शर्मा, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज – राशिद खान, टी नटराजन, मोहम्मद शमी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| हैदराबादसमोर विजयीरथावर स्वार गुजरातचे आव्हान; केव्हा आणि कुठे होणार सामना, घ्या जाणून
पहिल्या षटकात ट्रेंट बोल्टचेच राज्य, आयपीएलमध्ये २०२२नंतर तब्बल १२ वेळा केली ‘ही’ कामगिरी