मुंबई। गुरुवारी (१४ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २४ वा सामना खेळला जाणार असून हा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल, तर त्यापूर्वी ७.०० वा संध्याकाळी नाणफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो राजस्थान रॉयल्सचा संभावित ११ जणांचा संघ –
आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आत्तापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. राजस्थानने ४ सामने आत्तापर्यंत खेळले असून ३ जिंकले आहेत आणि १ सामना पराभूत झाला आहे. त्यांना हीच चांगल्या कामगिरीची लय कायम राखण्याची अपेक्षा पाचव्या सामन्यातही असेल.
या सामन्यासाठी राजस्थान संघाच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (RR Predicted XI) विचार करायचा झाल्यास जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच मधली फळी कर्णधार संजू सॅमसनसह (Sanju Samson) रस्सी वॅन डर ड्यूसेन आणि शिमरॉन हेटमायर सांभाळू शकतात. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून रियान परागचा पर्याय आहे. तसेच गोलंदाजीत आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा कायम राहू शकतात.
राजस्थान रॉयल्सचा संभावित ११ जणांचा संघ – जोस बटलर (यष्टीरक्षक), देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), रस्सी वॅन डर ड्यूसेन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा
असा असू शकतो गुजरात टायटन्सचा संभावित ११ जणांचा संघ –
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांतील पहिले तीनही सामने जिंकले आहेत. मात्र त्यांना चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी, पाचव्या सामन्यातून ते पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यासाठी त्यांचा संभावित ११ जणांचा (GT Predicted XI) संघ कसा असू शकतो याचा विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक मॅथ्यू वेडसह शुबमन गिल सलामीला उतरू शकतो. तसेच साई सुदर्शन, डेव्हिड मिलर यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहर यांना मधल्या फळीत संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खानसह लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नळकांडे यांचा पर्याय असेल.
गुजरात टायटन्सचा संभावित ११ जणांचा संघ – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.
अशी असू शकते ड्रीम ११ –
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Rajasthan Royals vs Gujarat Titans) संघात होणाऱ्या सामन्यातील फँटसी ११ (Dream XI) बद्दल विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून जोस बटलर चांगला पर्याय ठरू शकतात. तसेच फलंदाजीमध्ये शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, अभिनव मनोहर, साई सुदर्शन यांची निवड केली जाऊ शकते. तसेच अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी राशिद खान, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, दर्शन नळकांडे आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो. कर्णधार म्हणून फॉर्ममध्ये असलेल्या युजवेंद्र चहलला, तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्याला निवडले जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) ड्रीम ११
कर्णधार – युजवेंद्र चहल
उपकर्णधार – हार्दिक पंड्या
यष्टीरक्षक – जोस बटलर
फलंदाज – शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, अभिनव मनोहर, साई सुदर्शन
अष्टपैलू – हार्दिक पंड्या
गोलंदाज – राशिद खान, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, दर्शन नळकांडे, ट्रेंट बोल्ट
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधून का खेळले बेंगलोर संघाचे खेळाडू? घ्या जाणून
आरसीबीच्या गोलंदाजांना खणखणीत ९ षटकार चोपत रॉबिन उथप्पाचा मोठा विक्रम, दिग्गजांच्या यादीत झाला सामील
विरोधी संघांच्या ‘या’ फंड्यामुळे राशिद खानला मिळत नाहीयेत जास्त विकेट्स; स्वत:च सांगितले कारण