मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. आता २४ वा सामना गुरुवारी पार पडणार असून हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडेल. दोन्ही संघांसाठी हा हंगामातील प्रत्येकी ५ वा सामना असणार आहे.
राजस्थानने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर गुजरातने देखील ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता गुरुवारी होणारा सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर येण्याची संधी असणार आहे.
असा असू शकतात संभावित ११ जणांचे संघ
आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता ते एकमेकांसमोर तगडे आव्हान ठेवतील हे नक्की आहे. दरम्यान या सामन्यासाठी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संभावित ११ जणांच्या संघाचा (RR Predicted XI) आढावा घ्यायचा झाल्यास जोस बटलर आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजी करू शकतात.
तसेच मधली फळी कर्णधार संजू सॅमसनसह (Sanju Samson) रस्सी वॅन डर ड्यूसेन आणि शिमरॉन हेटमायर सांभाळू शकतात. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून रियान परागचा पर्याय आहे. तसेच गोलंदाजीत आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा कायम राहू शकतात.
त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरात टायटन्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (GT Predicted XI) बोलायचे झाल्यास यष्टीरक्षक मॅथ्यू वेडसह शुबमन गिल सलामीला उतरू शकतो. तसेच साई सुदर्शन, डेव्हिड मिलर यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहर यांना मधल्या फळीत संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खानसह लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नळकांडे यांचा पर्याय असेल.
आमने-सामने
गुजरात टायटन्स हा संघ आयपीएल २०२२ हंगामात नव्याने सहभागी झाला आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना झालेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (Rajasthan Royals vs Gujarat Titans) या संघातील सामना डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी (Dr DY Patil Sports Academy, Mumbai) येथे खेळवला जाणार आहे. याच मैदानात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सामना खेळवण्यात आला होता, ज्यात फिरकीपटूंचे वर्चस्व दिसले होते. जर गुरुवारचा सामना देखील अशाच खेळपट्टीवर खेळवण्यात आला तर फिरकीपटूंना मदत मिळू शकते.
त्याचबरोबर फलंदाजांसाठीही या मैदानाची खेळपट्टी नंदनवन समजली जाते. तसेच बऱ्याचदा या मैदानातील खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना उसळी देखील मिळते. असे असले तरी आत्तापर्यंतचे आयपीएल सामन्यांतील निकाल पाहिले, तर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेऊ शकतो.
या सामन्यादरम्यान मुंबईतील तापमान साधारण २९ ते ३० डिग्री सेल्सियस दरम्यान राहू शकते. त्याचबरोबर आद्रता ६५ ते ७५ टक्क्यांच्या आसपास असू शकते.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) राजस्थान विरुद्ध गुजरात (RR vs GT) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना १४ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील राजस्थान विरुद्ध गुजरात सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
राजस्थान रॉयल्स संघ: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रॅसी वॅन डर ड्यूसेन, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, जेम्स नीशम, नवदीप सैनी, नॅथन कुल्टर-नाईल, करुण नायर, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, ओबेद मॅककॉय, तेजस बारोका, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल, अनुनय सिंग, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल.
गुजरात टायटन्स संघ: मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे, वृद्धिमान सहा, प्रदीप संगवान, वरुण ऍरॉन, जयंत यादव, विजय शंकर, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, यश दयाल, नूर अहमद.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| राजस्थान वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!