मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (१५ एप्रिल) २५ वा सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल २०२२ हंगामातील सहावा सामना असणार आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादचा हा पाचवा सामना असणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२ हंगामात पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. तसेच सनरायझर्स हैदराबादने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत.
असा असू शकतो कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ
आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली आहे. आता त्यांना सहावा सामना सनरायझर्स हैदाराबाद संघाविरुद्ध खेळायचा असून या सामन्यासाठी कोलकाताचा संभावित ११ जणांचा संघ (KKR Predicted XI) कसा असू शकतो याचा आढावा घेऊ.
कोलकाता सलामीसाठी वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यावरच सलामीसाठी विश्वास ठेऊ शकतात. तसेच मधल्या फळीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश राणा, यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स यांची निवड होऊ शकते. अष्टपैलू खेळाडूंसाठी आंद्रे रसेल आणि सुनील नारायणला पसंती मिळू शकते, तर गोलंदाजीत पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक दार आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड होऊ शकते.
कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ – वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक दार, वरुण चक्रवर्ती.
असा असू शकतो सनरायझर्स हैदराबादचा संभावित संघ
केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण नंतर संघाने चांगले पुनरागमन करत सलग २ विजय मिळवले. आता सनरायझर्स हैदराबादला पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आपल्या ११ जणांच्या संघात (SRH Predicted XI) फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे.
हैदराबादकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियम्सन उतरू शकतात. तसेच मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, यष्टीरक्षक निकोलस पूरन आणि शशांक सिंग यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रेयस गोपाळ आणि मार्को जेन्सेन यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक यांचे चांगले पर्याय आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा संभावित संघ – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, मार्को जेन्सेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
अशी असू शकते ड्रीम ११
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders) संघातील सामन्याच्या फँटसी ११ संघाबद्दल विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून सॅम बिलिंग्स आणि निकोलस पूरन यांचा समावेश करू शकतो. तसेच फलंदाजीत केन विलियम्सन, श्रेयस अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांना संधी दिली जाऊ शकते, तर अष्टपैलू म्हणून पॅट कमिन्स आणि वेंकटेश अय्यर यांचा चांगला पर्याय असून गोलंदाजीसाठी उमेश यादव, टी नटराजन, सुनील नारायण आणि मार्को जेन्सेन यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. तसेच कर्णधार व्यंकटेश अय्यर म्हणून आणि उपकर्णधार उमेश यादव म्हणून निवडू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) ड्रीम ११
कर्णधार – वेंकटेश अय्यर
उपकर्णधार – उमेश यादव
यष्टीरक्षक – सॅम बिलिंग्स, निकोलस पूरन
फलंदाज – केन विलियम्सन, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी
अष्टपैलू – पॅट कमिन्स, वेंकटेश अय्यर
गोलंदाज – उमेश यादव, टी नटराजन, सुनील नारायण, मार्को जेन्सेन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
स्वागत करू नववर्षाचे! चेन्नईच्या खेळाडूंकडून तमिळ नवीन वर्ष जल्लोषात साजरे, पाहा Video
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल