मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना गुरुवारी होणार आहे. हा सामना आयपीएलमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल, तसेच त्यापूर्वी ७.०० वाजता नाणेफेक पार पडेल. दरम्यान या सामन्यासाठी फँटेसी ११ कशी असू शकते याचा आढावा घेऊ.
असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ –
चेन्नई सुपर किंग्स संघाने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात (IPL 2022) ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात पराभव पत्करला असून १ सामना जिंकला आहे. त्यामुळे चेन्नईला विजयी लयीत परतण्याचे आव्हान आहे. आता चेन्नई संघाला सातवा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी चेन्नईच्या अंतिम ११ जणांच्या संघात (CSK Predicted XI) फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा हे सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात, तर मधली फळी अष्टपैलू मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे आणि एमएस धोनी सांभाळू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून संघात कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ड्वेन प्रीटोरियस आणि ड्वेन ब्रावो असू शकतील. हे तिघे गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. तसेच त्यांच्या जोडीला गोलंदाजी फळीत महिश तिक्षणा आणि मुकेश चौधरी देखील असू शकतात.
चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन प्रीटोरियस, ड्वेन ब्रावो, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी.
असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित संघ
चेन्नईप्रमाणेच मुंबई इंडियन्सही आयपीएल २०२२ हंगामात संघर्ष करत आहे. त्यांनी या हंगामात आत्तापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात पराभवाचा सामना केला असल्याने त्यांना आता विजयाची प्रतिक्षा आहे. त्यांना सातवा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळायचा आहे.
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (MI predicted XI) विचार करायचा झाल्यास कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन सलामीला फलंदाजीसाठी उतरू शकतात. तसेच मधली फळी डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा सांभाळू शकतात. त्यांना अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि फॅबियन ऍलेन यांचीही साथ मिळू शकते. तसेच गोलंदाजीत जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
मुंबई इंडियन्सचा संभावित संघ – रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलेन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.
अशी असू शकते ड्रीम ११
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) संघात होणाऱ्या सामन्याच्या ड्रीम ११ बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून इशान किशनला संधी देऊ शकतो. तसेच फलंदाजीत सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस यांना संधी देऊ शकतो. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून रविंद्र जडेजाची निवड होऊ शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, महिश तिक्षणा, ड्वेन ब्रावो आणि जयदेव उनाडकट यांच्यावर विश्वास दाखवू शकतो. तसेच कर्णधार म्हणून रविंद्र जडेजाची आणि उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करू शकतो.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) ड्रीम ११
कर्णधार – रविंद्र जडेजा
उपकर्णधार – ऋतुराज गायकवाड
यष्टीरक्षक – इशान किशन
फलंदाज – सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस
अष्टपैलू – रविंद्र जडेजा
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, महिश तिक्षणा, ड्वेन ब्रावो, जयदेव उनाडकट
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना संकटानंतरही विजय मिळवल्यावर पंतची लक्षवेधी प्रतिक्रिया, तर मयंकनेही सांगितले पराभवाचे कारण
पाँटिंगचा ‘हा’ गुरुमंत्र आला कामी, दिल्लीने पंजाबला केलं चारीमुंड्या चीत
आयपीएल इतिहासात ‘ही’ अवघड कामगिरी करणारा दिल्ली पहिलाच संघ, पंजाबविरुद्ध केलाय पराक्रम






